शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

लोकमत सरपंच अवॉर्डचे १७ ला वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:12 IST

नाशिक : ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी जिल्हाभरातून दाखल झालेल्या प्रवेशिकांवर अखेरचा हात फिरवत परीक्षक मंडळाने पुरस्कारार्थी सरपंचांची निवड निश्चित केली असून, येत्या बुधवारी (दि. १७) हॉटेल एक्स्प्रेस इन येथे सकाळी ११ वाजता शानदार सोहळ्यात पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनिवड निश्चित : परीक्षक मंडळाने प्रवेशिकांवर फिरविला अखेरचा हात सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा हा पहिलाच पुरस्कार

नाशिक : ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी जिल्हाभरातून दाखल झालेल्या प्रवेशिकांवर अखेरचा हात फिरवत परीक्षक मंडळाने पुरस्कारार्थी सरपंचांची निवड निश्चित केली असून, येत्या बुधवारी (दि. १७) हॉटेल एक्स्प्रेस इन येथे सकाळी ११ वाजता शानदार सोहळ्यात पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.गावातील सर्व समाजाला बरोबर घेऊन गावचा चेहरामोहरा बदलविणाºया सरपंचांना ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अवॉर्ड-२०१७’ने गौरविण्याचा निर्णय लोकमतने घेतला आहे. गावगाडा चालविणाºया सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. ‘पतंजली आयुर्वेद’ हे या उपक्रमाचे प्रायोजक, तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत. पहिल्याच वर्षी या पुरस्कारांना जिल्हाभरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सुमारे तीनशेहून अधिक प्रवेशिका दाखल झाल्या आहेत.प्रवेशिकांमधून उत्कृष्ट कार्य केलेल्या सरपंचांची व ग्रामपंचायतींची निवड परीक्षक मंडळाने केली असून, बुधवारी हॉटेल एक्स्प्रेस इन येथे होणाºया कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे, ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे उपस्थित राहाणार आहेत, तर प्रमुख वक्ते म्हणून कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक, राष्टÑपती पारितोषिक विजेते सरपंच भास्करदादा पेरे हे उपस्थित राहणार आहेत.परीक्षक मंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी लोकमतच्या अंबड कार्यालयात बैठक संपन्न झाली. बैठकीस परीक्षक मंडळाचे सदस्य कृषी अभ्यासक डॉ. गिरधर पाटील, वीज मंडळाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता अरविंद गडाख, प्रगतीअभियानच्या प्रवर्तक अश्विनी कुलकर्णी, जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, पर्यावरण विषयक चळवळीचे कार्यकर्ते निशिकांत पगारे उपस्थित होते. परीक्षकांनी बारकोड पद्धतीने जलव्यवस्थापन, वीजव्यवस्थापन, शैक्षणिक, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामसंरक्षण, पर्यावरण, ई-प्रशासन, रोजगार निर्मिती, कृषी तंत्रज्ञान, उदयोन्मुख नेतृत्व, सरपंच आॅफ द इयर या विभागात सर्वसंमतीने १३ सरपंचांची निवड केली आहे. लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यावेळी उपस्थित होते.सरपंचांच्या दाव्यांची आॅनलाइन पडताळणी सरपंचांची निवड करताना लोकमत केवळ प्रवेशिकेमध्ये केलेल्या दाव्यांवरच थांबले नाहीत, तर संबंधित सरपंचाने केलेला दावा खरा आहे की खोटा याची त्या त्या परिसरातील प्रतिनिधींकडून खातर जमा करून घेतानाच विविध श्रेणींसाठी जिल्हा परिषद व शासकीय योजनांच्या क्रियान्वयनाची आॅनलाइन पडताळणीही लोकमतने करून घेतली. प्रत्येक श्रेणीसाठी निर्धारीत निकषांआधारे एकूण १०० गुणांपैकी गुण प्रदान करुन संबंधित सरपंच व ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली.बारकोडिंगचा अवलंबलोकमत सरपंच अवॉर्डसाठी सरपंचांची निवड करताना आलेल्या प्रवेशिकांना दहावी-बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांना करण्यात येणाºया बारकोडिंगप्रमाणे बोरकोडिंग करण्याची सूचना परीक्षक मंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री विनायकदादा पाटील यांनी मांडली होती. निवड करताना ग्रामपंचायतीचे अथवा सरपंचाचे नाव परीक्षकांसमोर येऊ नये हा त्यामागील उद्देश होता. त्यामुळे दाखल झालेल्या सर्व प्रवेशिकांना बारकोडिंग करून त्याप्रमाणेच परीक्षकांनी सरपंचांची निवड केली. परिणामी परिक्षकांच्या दृष्टीनेही निवड झालेल्या सरपंचांची नावे गुलदस्त्यातच आहेत.