शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लब आॅफ गोंदेश्वर कडून आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 14:35 IST

सिन्नर:शिक्षकाबरोबरच आपले आई-वडील, भाऊ- बहीण पती किंवा पत्नी व मित्र परिवार हे सुद्धा आपल्या जीवनाला सुसंस्कृत दिशा व भरारी देतात. त्यामुळे त्यांचे आपल्या जीवनातील स्थान गुरु समानच असते, असे प्रतिपादन रोटरी क्लब आॅफ गोंदेश्वरचे संस्थापक अध्यक्ष सतीश नेहे यांनी केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब आॅफ गोंदेश्वरच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण मातोश्री नर्मदा लॉन्सवर करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अगदी मोजक्या २० पाहुण्यांच्या उपस्थिती

सिन्नर:शिक्षकाबरोबरच आपले आई-वडील, भाऊ- बहीण पती किंवा पत्नी व मित्र परिवार हे सुद्धा आपल्या जीवनाला सुसंस्कृत दिशा व भरारी देतात. त्यामुळे त्यांचे आपल्या जीवनातील स्थान गुरु समानच असते, असे प्रतिपादन रोटरी क्लब आॅफ गोंदेश्वरचे संस्थापक अध्यक्ष सतीश नेहे यांनी केले.शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब आॅफ गोंदेश्वरच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण मातोश्री नर्मदा लॉन्सवर करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अगदी मोजक्या २० पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्काराने माध्यमिक विभागातून नारायण गडाख (न्यू इंग्लिश स्कुल, पंचाळे), संध्या गडाख (माध्यमिक विद्यालय, मुसळगाव ), प्राथमिक विभागातून बाळासाहेब सदगीर (प्राथमिक विद्यालय, पिंपळे), प्रशांत हेकरे (जि. प. शाळा, धुळवड), सुधाकर कोकाटे (एस. जी. पब्लिक स्कुल, सिन्नर) यांना गौरविण्यात आले.आदर्श पिढी व नागरिक घडविण्यात शिक्षकांचा सिहांचा वाटा असतो असे माजी अध्यक्ष बाळासाहेब सदगीर यांनी प्रास्ताविकात सांगितले .क्लबचे अध्यक्ष महेश बोऱ्हाडे यांनी रोटरीचे उद्दिष्ट्य सांगून आंतर राष्ट्रीय रोटरीच्या 'टिच' या टिचर सपोर्ट, ई लर्निंग, अ‍ॅडाल्ट लीटरसी, चाईल्ड डेव्हलपमेन्ट, हॅपी स्कुल या उपक्रमाबद्दल माहिती दिली. गुरुजनांनी आपल्याला घडविले आहे, त्यामुळे त्यांचा सर्वच आदर करतात, असे बोऱ्हाडे यांनी सांगितले .सूत्रसंचलन माजी अध्यक्ष सुभाष परदेशी व सेक्रेटरी अनिल गोर्डे यांनी केले. सन्मानित शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सोमनाथ वाघ यांनी आदर्श शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत आभार मानले. 

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनStudentविद्यार्थी