नाशिक : कोरेोना विषाणूपासून बचाव करण्याकरीता देशात व राज्यात सुरु असलेल्या जमावबंदी,संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अनेक गोरगरीब कुटुंबांची उपासमार होत आहे. यागरजूंना किमान दोनवेळचे भोजन मिळावे या हेतूने मुंबइ ना येथील युवक मित्र मंडळाच्या वतीने शहर परिसरातील शेकडो गरजू कुटुंबांना अन्न, धान्याचे वाटप करण्यात आले.माजी आमदार वसंत गिते यांच्या वतीने युवक मित्र मंडळाच्या माध्यमातून गोर गरीब गरजू कुटूंबाना सर्व प्रकारचे अन्न धान्य मोफत वाटप करण्यात येत आहे. गत काही दिवसांपासून ही मदत दिली जात असून आत्तापर्यंत सुमारे १४०० ते १६०० कुटुंबापर्यंत पोचलो असून या पुढेही काही दिवस हा उपक्र म गरजवंतांसाठी चालू राहणार आहे. या उपक्र मासाठी शहरांतील अनेक मान्यवर व्यक्तींनी सहयोग मिळत असल्याचे जतिे यांनी सांगितले. या उपक्रमाकरीता माजी उपमहापौर प्रथमेश गिते, विकास शेवाळे, सुभाष कडलग, श्याम शिंदे, गणेश मोरे, प्रशांत भदाणे, सुनील ढोले, श्रीकांत जोशी, विनोद गाडे, शिवा गिते, अमित गोरे आदींसह मंडळाचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत .(फोटो ०५ गिते, १)
गरजु कुटुंबियांना युवक मित्र मंडळाकडून धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 19:28 IST
नाशिक : कोरेोना विषाणूपासून बचाव करण्याकरीता देशात व राज्यात सुरु असलेल्या जमावबंदी,संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अनेक गोरगरीब कुटुंबांची उपासमार होत आहे. यागरजूंना किमान दोनवेळचे भोजन मिळावे या हेतूने मुंबइ ना येथील युवक मित्र मंडळाच्या वतीने शहर परिसरातील शेकडो गरजू कुटुंबांना अन्न, धान्याचे वाटप करण्यात आले.
गरजु कुटुंबियांना युवक मित्र मंडळाकडून धान्य वाटप
ठळक मुद्देहा उपक्र म गरजवंतांसाठी चालू राहणार आहे.