शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेवाडी येथे 50 विद्यार्थ्यांना एफ एम वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 00:09 IST

ओझरटाऊनशिप : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेवाडी( ओझर) येथे 50 गरीब विद्यार्थ्यांना ओझर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्यातर्फे रेडिओ एफ एम चे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्दे शिक्षकांनी हा आगळावेगळा उपक्रम घडवून आणला.

ओझरटाऊनशिप : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेवाडी( ओझर) येथे 50 गरीब विद्यार्थ्यांना ओझर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्यातर्फे रेडिओ एफ एम चे वाटप करण्यात आले.शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांच्या प्रेरणेने जिल्हाभर एफ एम रेडिओ वाटप असे उपक्रम चालू आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून काल बुधवार रोजी निफाड तालुक्यातील ओझर केंद्रातील सर्व शिक्षकव्रुंद यांनी गरीब विद्यार्थ्यांना एफ एम रेडीओ चे चे वाटप केले. या एफ एम रेडीओ वर अनेक प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम विद्यार्थ्यांना ऐकायला मिळावेत व त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शिक्षकांनी हा आगळावेगळा उपक्रम घडवून आणला.

निफाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप कराड व निफाड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार यांनी निफाड तालुक्यात एफ एम रेडिओ वाटप करण्याचे आवाहन केले होते. या आवाहानास प्रतिसाद देत ओझर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी स्वखर्चातून एकूण पन्नास विद्यार्थ्यांना एफ एम रेडीओ चे वाटप केले. हा कार्यक्रम बुधवार दिनांक 21 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेवाडी ओझर येथे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ओझर मुले शाळेतील शिक्षिका श्रीमती योगेश्वरी सोनवणे यांनी एफ एम रेडीओ वर कोणत्या प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम दाखवले जातात याची माहिती दिली. एफ एम रेडीओ चे प्रात्यक्षिक श्रीमती बिरारी यांनी करून दाखविले. एफ एम रेडिओ मिळाल्यामुळे परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना व पालकांना खूप आनंद झाला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.यावेळी वंदना धरमखेले यांनी स्वखर्चातून एका गरीब विद्यार्थ्यांला एक मोबाईल डोनेट केला.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदSchoolशाळा