शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

महाराजस्व अभियानांतर्गत दाखले वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 23:15 IST

मेशी : महाराजस्व अभियानांतर्गत देवळा तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांच्या सूचनेप्रमाणे तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शासकीय शुल्कात दाखले काढून दिले जातात.

ठळक मुद्देदेवळा तालुका : मेशी, लोहोणेर, उमराणे, वासोळ येथे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कमेशी : महाराजस्व अभियानांतर्गत देवळा तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांच्या सूचनेप्रमाणे तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शासकीय शुल्कात दाखले काढून दिले जातात.दहावीच्या व बारावीच्या परीक्षेनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आदी दाखल्यांसाठी धावपळ करावी लागते. आवश्यक दाखले शालेयस्तरावर उपलब्ध व्हावेत याबाबत नायब तहसीलदार विजय बनसोडे यांनी सर्व मुख्याध्यापकांना व तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र संचालकांना सूचना दिल्या.तालुक्यात उमराणे, लोहोणेर व देवळा अशा तीनही महसूल मंडलांमध्ये अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.वासोळ शाळेतही वाटपवासोळ येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले. शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत मेशी येथील आपले सरकार सेवा केंद्रातर्फे शैक्षणिक दाखल्यांची आॅनलाइन नोंदणी केली जाते. राजस्व अभियानांतर्गत फक्त दोन दिवसात दाखल्यांचे वितरण करण्यात येत असल्याने शासनाची ही योजना देवळा तहसीलदार यांच्याकडून परिणाम कारकरित्या राबविली जात असल्याने पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.उमराणे येथील आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक जयवंत पाटील यांनी गिरणारे येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात व उमराणे येथील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये शैक्षणिक दाखल्यांचे वितरण नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत करण्यात आले.लोहोणेर येथील जनता विद्यालयात सरपंच दीपक बच्छाव व मंडळ अधिकारी राम परदेशी यांच्या हस्ते शैक्षणिक दाखल्यांचे वाटप करण्यात आले. देवळा येथील आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक योगराज पाटील व लोहोणेर येथील आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक मच्छिंद्र महिरे यांच्या प्रयत्नातून दाखले प्राप्त झाल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले.शालेय स्तरावर महाराजस्व अभियान राबवून तालुक्यातील जास्तीत जास्त मुलांना शासकीय शुल्कात दाखले उपलब्ध करून देण्यात येत आहेत.- दत्तात्रेय शेजूळतहसीलदार, देवळा

टॅग्स :Governmentसरकारkalwan-acकळवण