पेठ - महाराजस्व अभियान ‘शासन आपल्या दारी’ उपक्र माअंतर्गत महसूल विभागाच्यावतीने आदिवासी विद्यार्थ्यांना विविध शासकिय दाखल्यांचे घरपोहच वाटप करण्यात आले. कोहोर येथील शासकिय आश्रम शाळेत उपविभागीय अधिकारी डॉ. संदिप आहेर यांचे हस्ते २२१ विद्यार्थ्यांना वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र,७६ मुलांना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार संदीप भोसले, सरपंच गिरीधर वाघेरे, पोलीस पाटील सोमनाथ वाघेरे, महा इ सेवा केंद्राचे संचालक शेख तसौवर, मुख्याध्यापक प्रकाश पगार, अधिक्षक संतोष सुर्यवंशी यांचेसह शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोहोर येथे दाखल्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 13:09 IST