दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथे दिव्यांग बांधवांना मोफत अंत्योदय रेशनकार्ड वाटप करण्यात आले. व्यासपीठावर मोहाडी सोसायटीचे धान्य विभागप्रमुख रवींद्र शार्दुल, विजय पालखेडे उपस्थित होते. समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तींकडे त्यांच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्यांकडे पाहून त्यांच्यामधील असलेले सुप्त सामर्थ्य विकसित करून त्यांना समाज जीवनाच्या सर्व अंगामध्ये समानसंधी असावी, असे प्रतिपादन प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे उपतालुकाध्यक्ष राजेंद्र शिंपी यांनी केले. यावेळी मुकेश देशमुख, विजय तिडके, भारत ढेपले, संतोष मंडलिक, प्रतिभा शेळके आदी उपस्थित होते,
मोहाडीत दिव्यांगांना अंत्योदय रेशनकार्डचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 02:16 IST