शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:05 IST

पोलीओमुक्ततेसाठी रोटरी क्लबचे कामकाज आणि कार्य अभिमानास्पद, कौतुकास्पद असल्याने ग्रामीण व आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण ही समस्या वाढत असल्याने या प्रश्नासंदर्भात रोटरी क्लबने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी केले.

कळवण : पोलीओमुक्ततेसाठी रोटरी क्लबचे कामकाज आणि कार्य अभिमानास्पद, कौतुकास्पद असल्याने ग्रामीण व आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण ही समस्या वाढत असल्याने या प्रश्नासंदर्भात रोटरी क्लबने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी केले.  रोटरी क्लब आॅफ कळवण व इनरव्हील क्लब आॅफ कळवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कळवण शहर व तालुक्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी पवार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी रोटरीचे सहप्रांतपाल राजेंद्र भामरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लाडशाखीय वाणी समाजाचे अध्यक्ष डॉ. पी. एच. कोठावदे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहनलाल संचेती, माजी उपप्रांतपाल विलास शिरारे, कळवण मर्चण्ट बॅँकेचे संचालक योगेश मालपुरे, राजेंद्र अमुतकार, गटशिक्षणाधिकारी ई . एन. पवार, डॉ. एस. बी. सोनवणे, सरचिटणीस निंबा पगार, प्रमिला जैन आदी उपास्थित होते. यावेळी आदर्श शिक्षकांना सन्मानित करण्यात येणारे पुरस्कारार्थींना भगवे फेटे बांधून सपत्नीक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्र माचे अध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी कळवण रोटरी क्लब व इनरव्हील क्लब यांच्या वतीने देण्यात येत असलेले पुरस्कार हे कळवणसारख्या आदिवासी व खेडे-पाड्यातील कार्याचा उचित सन्मान असल्याचे सांगून कळवण रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष गालिब मिर्झा व इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष मीनाक्षी मालपुरे यांनी उपक्रमांची माहिती दिली. रोटरी क्लबचे सदस्य रवींद्र कुमावत व प्रशांत पगार यांची सद्गुरु गजानन पतसंस्थेच्या उपाध्यक्ष व जनसंपर्क संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी नीलेश भामरे, पी. एम. महाडिक, ज्योतिमाला देशमुख, निशिकांत बागुल, बापू पवार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. विलास शिरारे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य सुचिता रौंदळ यांनी सूत्रसंचालन केले. जितेंद्र कापडणे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब व इनरव्हील क्लब व रोटरॅक्ट क्लबचे सर्व सदस्य प्रयत्नशील होते.पुरस्कारार्थी शिक्षकइनरव्हील क्लबच्या वतीने नीलेश भामरे, ज्योतिमाला देशमुख, नितीन पाटील, तुषार पवार, जानकाबाई बागुल, योगेश अहिरे, राजेंद्र जाधव, बापू पवार, निर्मला देवरे, हेमंत सोनवणे, कल्पना पाटील, शैला कापडणीस, पांडुरंग महाडिक, लीना पाटील, सविता पवार, धनराज भोये, कैलास निकम तर रोटरी क्लब आॅफ कळवणच्या वतीने रमेश सोनवणे, भरत पाटील, संजय शिंदे, प्रा. किरण सूर्यवंशी, भास्कर बहिरम, भूषण सूर्यवंशी, महारू निकम, प्रा. एम. एम. शिरसाठ, निशिकांत बागुल, सुरेश येवला, अरु ण वाघ, निसार सय्यद यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.