निफाड : तालुक्यातील दावचवाडी येथे न्यायमूर्ती रानडे विद्या प्रसारक मंडळ संचलित योगेश्वर विद्यालयात शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त प्रभाकर कुयटे, स्कूल कमिटी सदस्य बाळासाहेब धुमाळ, रमेश शिंदे, बाबाजी शिरसाट, तुकाराम धुमाळ, शरद कुयटे, दिनकर कुयटे, मुख्याध्यापक चंद्रभान वाघ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी दावचवाडी येथील शिवरुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने शालेय गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन सिद्धी बैरागी व शिवानी कुयटे यांनी केले. मुख्याध्यापक चंद्रभान वाघ यांनी आभार मानले.
गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 18:36 IST