शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

रामकुंडावर अभिनव आंदोलन : नात्याचे दान करत त्रस्त पतींनी केले मुंडन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 16:12 IST

कायद्याने नव्हे तर धार्मिक परंपरा अन्य रितीरिवाजानुसारच पत्नीपासून सुटका मिळावी, अत्याचारी पत्नींविरोधात पुरु ष हक्कांच्या संरक्षणाच्या घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या.

ठळक मुद्देनाते केले स्वाह...!नातेदान हाच एकमेव पर्याय मानून हवन कार्यकर्त्यांनी चक्क रामकुंडावर येत मुंडन केले

नाशिक : कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायदे एकतर्फी असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या कायद्यात पुरूष हक्कांचा विचार होणे गरजेचे आहे, जेणेकरून महिलांकडून त्या कायद्यांचा गैरवापर करणे थांबेल अशी मागणी करत वास्तव फाउण्डेशन मुंबईच्य संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चक्क रामकुंडावर येत मुंडन केले अन् हवनमध्ये नात्याचे दान क रत रविवारी (दि.२२) अभिनव आंदोलनाने लक्ष वेधून घेतले.वास्तव फ ाउण्डेशन पुरूषांच्या न्यायहक्कांसाठी लढणारी संस्था आहे. पुरूषांवर दाखल महिलांकडून दाखल होणारे खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी या संस्थेचे पदाधिकारी प्रयत्न करतात. समाजात महिलांवर अन्याय अत्याचार होतो ही बाब खरी जरी असली तरी पुरूषांवर होणाऱ्या अन्यायअत्याचाराकडे मात्र कोणाचेही लक्ष जात नाही. विवाह केल्यानंतर घटस्फोट देऊन महिलांकडून नात्यांवर पाणी सोडले जाते. घटस्फोटाला कुठेही थारा नसून कौटुंबिक हिंसाचाराचा यासाठी आधार घेतला जातो, हे चुकीचे असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.कोणतीही चूक नसताना, केवळ मनाविरु द्ध विवाह केलेल्या पत्नींकडून खोटे गुन्हे दाखल केल्याने नाहक मानिसक त्रासासह अनेकांना तुरु ंगवासही भोगावा लागला आहे. अशा त्रस्त पतींनी सुमारे शंभरपेक्षा अधिक पतींनी या आंदोलनात सहभाग घेतला. कायद्याने नव्हे तर धार्मिक परंपरा अन्य रितीरिवाजानुसारच पत्नीपासून सुटका मिळावी, अत्याचारी पत्नींविरोधात पुरु ष हक्कांच्या संरक्षणाच्या घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. यावेळी वास्तव फांऊडेशनचे अमित देशपांडे, पुरुष हक्क संरक्षण समितीचे अ‍ॅड. धर्मेंद्र चव्हाण उपस्थित होते.नाते केले स्वाह...!महिला संरक्षण कायद्याचा गैरवापर केला जातो. परिणामी पतींसह त्यांचे कुटूंबियांची मानिसक, सामाजिक, आर्थिक प्रतिष्ठा पणाला लागते. तर दुसरीकडे न्यायालयाने घटस्फोट दिला तरी पतींच्या मनातील पत्नीविषयीची भावना जात नाही. कारण नसताना त्यांना त्रास सहन करावा लागतो. तसेच, हिंदू धार्मिक परंपरेमध्ये घटस्फोटाला मान्यता नाही. त्यामुळे त्यावर नातेदान हाच एकमेव पर्याय मानून हवन करत नात्या स्वाह... केले.

 

 

टॅग्स :NashikनाशिकgodavariगोदावरीWomenमहिलाmarriageलग्नDivorceघटस्फोट