शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मंडळांवरील विघ्न अखेर दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 01:18 IST

शहरात गणेशोत्सव मंडळांवरील अनेक विघ्ने यंदा दूर झाली आहेत. भालेकर मैदानावर आयुक्तांनी उत्सवासाठी परवानगी दिली आहे. तर स्मार्ट रोडचे मेहेर ते अशोकस्तंभ दरम्यानचे काम मंगळवारपर्यंत (दि.२७) पूर्ण होऊन हा मार्ग खुला केला जाण्याची शक्यता असल्याने अशोकस्तंभावरील दोन मंडळांना उत्सवासाठी परवानगी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ठळक मुद्देतयारी उत्सवाची : भालेकर येथे परवानगी, स्मार्ट रोडवरही संधी

नाशिक : शहरात गणेशोत्सव मंडळांवरील अनेक विघ्ने यंदा दूर झाली आहेत. भालेकर मैदानावर आयुक्तांनी उत्सवासाठी परवानगी दिली आहे. तर स्मार्ट रोडचे मेहेर ते अशोकस्तंभ दरम्यानचे काम मंगळवारपर्यंत (दि.२७) पूर्ण होऊन हा मार्ग खुला केला जाण्याची शक्यता असल्याने अशोकस्तंभावरील दोन मंडळांना उत्सवासाठी परवानगी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, रात्री दहा वाजेनंतर बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकावरील संगीताशिवाय देखावे खुले ठेवावेत तसेच मिरवणुकीतही रात्री दहा वाजेनंतर विसर्जनापर्यंत पारंपरीक वाद्ये वाजविण्यास परवानगी द्यावी ही मागणी तत्त्वत: पोलीस आयुक्तांनी मान्य केली आहे.नाशिक महानगर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.२७) यांसदर्भात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. मध्य नाशिक आणि गावठाणातील गणेशोत्सव पारंपरिक जागेवरच व्हावेत. मिरवणूक मार्ग हा गावठाण भागातून असून अनेक ठिकाणी वाडे धोकादायक असल्याने त्यासंदर्भात कारवाई करावी, रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, मेहेर, रविवार पेठ येथे फुटपाथवरील अतिक्रमणे त्वरित हटवावीत अशा मागण्या करण्यात आल्या. उच्च न्यायालयाचे आदेश म्हणून पोलिसांच्या वतीने रात्री दहा वाजता देखाव्यांवरील ध्वनिक्षेपक बंद करण्यास हरकत नाही; मात्र देखावे बंद करण्याची सक्ती करू नये, कारण बहुतांशी नागरिक हे रात्री देखावे पाहण्यास निघतात त्याचवेळी पोलीस अन्य व्यावसायिकांप्रमाणेच देखावे बंद करतात तसे करू नये त्याचप्रमाणे पुण्याच्या धर्तीवर रात्री दहा वाजेनंतर विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे तसेच गजानन शेलार, रामसिंग बावरी, शंकरराव बर्वे, बबलू परदेशी, पद्माकर पाटील यांनी केली आहे. भालेकर मैदानावर स्मार्ट पार्किंगमुळे गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. आठ मंडळांना याठिकाणी परवानगी देण्यात आली आहे.महापालिकेत आज गणेश मंडळांची बैठकमहापालिकेत दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील गणेश मंडळांची बैठक शुक्रवारी (दि. २३) दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. यावेळी महापालिकेबरोबरच विविध शासकीय खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGaneshotsavगणेशोत्सव