शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

पालखी सोहळ्यात अधिकाऱ्यांच्या प्रवेशाने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 23:06 IST

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दरवर्षाप्रमाणे यंदा त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पायी पालखी व दिंडी पंढरपूरला नियोजित वेळेत रवाना होऊ शकली नाही. परंतु आषाढी एकादशीलाच राज्यातून संतांच्या मानाच्या पालख्या पंढरपूर येथे रवाना होणार असून, त्यात संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांच्या पालखीचा समावेश आहे.

ठळक मुद्देवारकऱ्यांचे पालकमंत्र्यांना साकडे : जिल्हाबंदीच्या नियमामुळे ज्येष्ठांना प्रतिबंध

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दरवर्षाप्रमाणे यंदा त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पायी पालखी व दिंडी पंढरपूरला नियोजित वेळेत रवाना होऊ शकली नाही. परंतु आषाढी एकादशीलाच राज्यातून संतांच्या मानाच्या पालख्या पंढरपूर येथे रवाना होणार असून, त्यात संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांच्या पालखीचा समावेश आहे.बसमधून जाणाºया या पालखीसमवेत केवळ वीस वारकºयांना शासनाने परवानगी दिली असून, त्यात आता पोलीस, वैद्यकीय अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांचा सहभाग असल्याने तसेच ६५ वयावरील ज्येष्ठ वारकºयांना परवानगी नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.दरम्यान, संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संस्थानच्या पदाधिकाºयांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन यासंदर्भातील ६५ वयावरील ज्येष्ठ नागरिकांची अट शिथिल करावी, याबाबत साकडे घातले आहे. तसेच प्रशासकीय अधिकाºयांना वारीच्या बसमध्ये समावेश करण्यास वारकºयांचा विरोध आहे, संस्थानच्या पदाधिकाºयांनी भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, पालखी वाहनातून (बसमधून) जाण्यास शासनाने केवळ वीस वारकºयांना परवानगी दिली असून, त्यातून आता पोलीस, वैद्यकीय अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश केल्याने वीस वारकºयांना त्यात सहभागी होता येणार नाही, त्यातच ६५ वर्षांहून अधिक वयाच्या वारकºयांना सहभागाला प्रशासनाने हरकत घेतल्याने ज्येष्ठ विश्वस्तांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील वारकरी शिवशाही बसने संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पालखी घेऊन जाणारआहेत. त्यात दोन मानकरी, दोन झेंडेकरी, दोन पुजारी, दोन पोलीस, दोन वैद्यकीयअधिकारी आणि दहा विश्वस्तांचा समावेश असेल. मात्र विश्वस्तांमध्ये तीन ते चार विश्वस्त हे ६५पेक्षा जास्त वयाचे असल्यानेत्यांना यामध्ये सहभागी होता येणार नाही, त्याबद्दल या पदाधिकाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. योग्य उपाययोजनातीन जिल्ह्यातून जाणाºया या वारीत जिल्हाबंदीचे नियमामुळे ज्येष्ठांना प्रतिबंध आहे. त्यामुळे ज्येष्ठांना प्रवासात परवानगीसाठी शासनस्तरावर निर्णय घ्यावा लागणार आहे. यासाठी त्यांनी पालकमंत्र्यांना यासंबंधीचे निवेदन दिले आहे. यासंबंधी योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन मिळाल्याचे विश्वस्तांनी सांगितले.योग्य खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस,रु ग्णवाहिका, डॉक्टरांचे पथक वारीसोबत देण्यात यावे. मात्र त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहन असावे. नियोजित वारकºयांच्या बसमध्ये यांचा समावेश करू नये. वारीसाठी वीस वारकरी असावेत, असे ठरल्याने दोन स्वतंत्र वाहन असल्यास सोयीचे होईल.- पुंडलिकराव थेटे, विश्वस्त,संत निवृत्तिनाथ देवस्थान

टॅग्स :NashikनाशिकTempleमंदिर