शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अभियंता  बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे  मनपा कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:53 IST

कामाच्या अतिताणामुळे नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील यांनी जीवन संपविण्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्गात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. रवि पाटील प्रकरणानंतर महापालिकेत गेल्या साडेतीन महिन्यांपासून निर्माण झालेल्या ताण-तणावाला आता सोशल मीडियाच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली जात आहे. दरम्यान, या साºया प्रकरणात कर्मचारी संघटनांची बोटचेपी भूमिकाही संशयास्पद ठरत असून, कर्मचारी उघडपणे संघटनांच्या मुखंडांबाबत नाराजीचा सूर प्रकट करू लागले आहेत.

नाशिक : कामाच्या अतिताणामुळे नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील यांनी जीवन संपविण्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्गात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. रवि पाटील प्रकरणानंतर महापालिकेत गेल्या साडेतीन महिन्यांपासून निर्माण झालेल्या ताण-तणावाला आता सोशल मीडियाच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली जात आहे. दरम्यान, या साºया प्रकरणात कर्मचारी संघटनांची बोटचेपी भूमिकाही संशयास्पद ठरत असून, कर्मचारी उघडपणे संघटनांच्या मुखंडांबाबत नाराजीचा सूर प्रकट करू लागले आहेत.  गेल्या शनिवारी (दि.२६) आयुक्तांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमासाठी जातो, असे सांगून घरातून गेलेले नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता झाले. त्यांच्या वाहनात सापडलेल्या चिठ्ठीत त्यांनी आपण नोकरीच्या ठिकाणी कामाच्या अतिताणामुळे जीवन संपवत असल्याचे स्पष्ट केल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आहे. पाटील बेपत्ता होऊन तीन दिवस उलटले तरी अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे पाटील कुटुंबीय चिंतित असतानाच या प्रकरणामुळे महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यातही कमालीची अस्वस्थता पसरली आहे. गेल्या तीन-साडेतीन महिन्यांपासून महापालिकेत अधिकारी व कर्मचारी यांना सुट्या माहीत नसल्याचे सांगितले जात आहे. रात्री ९ ते १० वाजेपर्यंत कामकाज करावे लागत असल्याच्याही तक्रारी ऐकायला मिळत आहेत. महापालिकेने एनएमसी ई-कनेक्ट हे मोबाइल अ‍ॅप विकसित केले असले तरी त्यावर तक्रारींची वाढती संख्या आणि त्यांचा निपटरा करण्यासाठी मिळणारी मुदत यात तफावत असल्याने अनेकांना ताणतणावाने घेरल्याची चर्चा आहे. बºयाचशा तक्रारी या व्यक्तिगत भांडण-वादातून मांडल्या जात आहेत. त्यामुळे संबंधित तक्रारींची शहानिशा करण्यापासून ते त्यावर करावयाच्या कारवाईचा तपशील सादर करताना अधिकारी व कर्मचारी वर्गात दमछाक होताना दिसून येत आहे. महापालिकेत अगोदरच कर्मचारी संख्या कमी आहे. त्यात अनेकांकडे प्रभारी व अतिरिक्त कामाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ताणतणावाच्या अशा स्थितीत अनेकांवर निलंबनाची, वेतनवाढ रोखण्याच्या कारवाईची टांगती तलवार आहे. महापालिकेत रवि पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये, अशी प्रार्थना आता केली जाऊ लागली आहे. दरम्यान, महापालिकेत म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटना, सीटू व मनसेप्रणीत संघटना, वाहनचालकांची संघटना कार्यरत आहेत. मात्र, संबंधित संघटनांकडून सदर प्रकरणाबाबत बोटचेपी भूमिका घेतली जात असल्याने कर्मचारी वर्गात संघटनांच्या पदाधिकाºयांविरुद्ध नाराजीचा सूर उमटत आहे.सोशल मीडियातून संवेदनासहायक अभियंता रवींद्र पाटील यांच्या बेपत्ता होण्याच्या घटनेनंतर आता मनपातील कर्मचारी वर्गातून सोशल मीडियातून आपल्या संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. सहायक अभियंता रवि पाटील हिटलरशाहीचा बळी?, ‘मनपा की मौत का कुवा’, ‘छोड तू रवि..तू वापस आ...!’ अशा शीर्षकाखाली सोशल मीडियातून महापालिकेतील कारभाराचे दर्शन घडविले जाऊ लागले आहे. तीन दिवस उलटूनही रवींद्र पाटील यांचा ठावठिकाणा न लागल्याने महापालिका अधिकारी व कर्मचारी वर्गात अस्वस्थता आहे. शांत स्वभावाच्या रविकडून टोकाचे पाऊल उचलले गेल्याबद्दल अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका