नाशिक : जिल्हा माध्यमिक शिक्षक (एनडीएसटी)सोसायटीतील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. सोसायटीच्या संचालक मंडळाकडून कर्मचाऱ्यांना दमबाजी होत असून अंतर्गत व्यावहारांची माहिती बाहेर दिल्यास नोकरीवरून काढून टाकण्याचा दम देण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनेतर्फे सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. एनडीएसटी सोसायटीच्या विद्यमान संचालक मंडळाकडून कर्मचाऱ्यांवर विविध कारणांसाठी दबाव आणण्याचे प्रकार सुरू असून अंतर्गत बाबींची माहिती लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभाग अथवा अन्य कोणालाही सांगितल्यास वेतनवाढ रोखण्याचा आणि नोकरीतून काढून टाकण्याचा दम दिला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षके त्तर संघटनेचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम रकिबे व सरचिटणीस दशरथ जारस यांनी केला आहे. त्याचप्रमाणे सोसायटीच्या कर्मचाºयांना पदोन्नती रोखण्याचाही दम दिला जात असून अशा दमदाटी मुळे कर्मचारी वर्ग त्यांच्या तक्रारी मोकळे पणाने देत नाही. त्यामुळे सध्याचे संचालक मंडळ मोकाट सुटले आहेत असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई होण्याचा धाक उरलेला नाही. त्यामुळे विविद गैरव्यवहारांच्या प्रकरणांमध्ये कर्मचाºयांना बळी देण्याचा प्रकार सुरू आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी एनडीएसटीवरील संचालक मंडळ तत्काळ बरखास्त करून प्रशासक नेमावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेत्तर संघटनेने सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली अहे. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाट, शिक्षक विकास संघटनेचे कार्याध्यक्ष अनिल रौंदळ, जिल्हा सरचिटणीस सखाराम जाधव उपस्थित होते.
एनडीएसटी सोसायटी संचालक मंडळ बरखास्त करा ; शिक्षक शिक्षकेत्तर संघटनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 17:10 IST
एनडीएसटी सोसायटीतील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. सोसायटीच्या संचालक मंडळाकडून कर्मचाऱ्यांना दमबाजी होत असून अंतर्गत व्यावहारांची माहिती बाहेर दिल्यास नोकरीवरून काढून टाकण्याचा दम देण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनेतर्फे सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आहे
एनडीएसटी सोसायटी संचालक मंडळ बरखास्त करा ; शिक्षक शिक्षकेत्तर संघटनेची मागणी
ठळक मुद्दे एनडीएसटीवरील संचालक मंडळ हटविण्याची मागणी शिक्षक शिक्षकत्तेर संघटनेचे उपनिबंधकांना निवेदन