शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
3
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
6
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
7
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
8
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
9
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
10
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
11
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
12
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
13
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
14
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
16
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
17
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
18
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
19
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
20
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं

मांजरपाड्याचे ‘गाजर’ दाखवून दिशाभूल !

By admin | Updated: July 31, 2014 00:55 IST

मनमाड : जलहक्क संग्राम परिषदेचा अभ्यासदौरा...

मनमाड : निधीअभावी मांजरपाडा-१ प्रकल्पाचे काम दोन वर्षांपासून बंद असून, भविष्यात तीन वर्षांपर्यंत मांजरपाड्याच्या पाण्याचा एक थेंबही शेतकरी जनतेला मिळणार नसल्याचा अंदाज आहे, अशी परिस्थिती असताना निवडणुकीच्या तोंडावर मांजरपाड्याच्या पाण्याचे गाजर दाखवून जनतेच्या भावनांशी खेळू नये, असे आवाहन नांदगाव व चांदवड तालुका जलहक्क संग्राम परिषद व मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्वांत जास्त पाणीटंचाई होरपळ सोसणाऱ्या चांदवड तालुका (पूर्व) व मनमाडसह नांदगाव तालुक्यासाठी मांजरपाडा-१ योजनेचा प्रस्ताव असतानाही ते पाणी गोदावरी खोऱ्यात (येवला) वळवून नेले जात असल्याचा आरोप समितीच्या वतीने करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने समिती पथकाने मांजरपाडा-१ योजनेचा अभ्यास दौरा केला. नारायणगाव शिवारपर्यंत (ता.चांदवड) जेमतेम कालव्याने पाणी येऊ शकलेले आहे. तेथून पुढे परसूलपर्यंत प्रकल्प निर्मितीपासून आजतागायत पाणी आलेले नाही. दरसवाडी व तेथून डोंगरगाव (ता. येवला) ८० कि.मी.पर्यंत कालव्याने पाणी यायला किती वर्षे लागणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या योजनेच्या पूर्णत्त्वासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे, असे आवाहन मनमाड बचाव कृती समितीतर्फे करण्यात आले आहे. पथकात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आप्पा परदेशी, राजकमल पांडे, संतोष बळीद, तुकाराम सोनवणे, आर.व्ही. पाटील, सलीम सोनावाला, संतोष बाकलीवाल, महेंद्रस्ािंह परदेशी, नीलेश वाघ, उपाली परदेशी आदि कार्यकर्ते सहभागी होते. (वार्ताहर)