शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाचे नाराज विजय करंजकर यांची मराठा समाजाच्या मेळाव्यात हजेरी, चर्चांना उधान; राजकीय चर्चा केली नसल्याचा दावा

By संजय पाठक | Updated: March 28, 2024 16:47 IST

...मात्र आपण राजकीय दृष्टीने नव्हे तर समाजाची बैठक म्हणून उपस्थित राहिलो असे स्पष्टीकरण करंजकर यांनी दिले.

नाशिक - शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने ज्या विजय करंजकर यांना लोकसभेच्या नाशिकच्या जागेची कबुली देण्यात आली होती. त्यांचा ऐनवेळी पत्ता कापल्याने नाराज झालेल्या करंजकर यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत बंडखोरीचे संकेत दिले आहेत. त्यातच ते सकल मराठा समाजाच्या बैठकीस उपस्थित असल्याने चर्चेचा विषय ठरला. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात उमेदवार उभे करण्यासाठी ही बैठक हेाती. मात्र आपण राजकीय दृष्टीने नव्हे तर समाजाची बैठक म्हणून उपस्थित राहिलो असे स्पष्टीकरण करंजकर यांनी दिले.

ठाकरे गटाच्या वतीने विजय करंजकर हेच उमेदवार असणार अशी चर्चा गेल्या वर्षभरापासून होती. कारण तसे संकेत पक्ष प्रमुख आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुखांनी देखील दिले हेाते. मात्र, ऐनवेळच्या घडामोडीत राजकीय विजय करंजकर यांची उमेदवारी कापण्यात आली आणि सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या करंजकर यांनी बुधवारी (दि. २७) समर्थकांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली आणि ऐनवेळी उमेदवारी नाकारली असली तरी आपली सर्व तयारी झाली असल्याने निवडणूक लढविणारच असे सांगून बंडखोरीचे संकेत दिले.

दरम्यान, गुरूवारी (दि.२८) छत्रपती संभाजीनगर रोडवर एका लॉन्समध्ये झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीला विजय करंजकर यांनी हजेरी लावली. त्यामुळेच करंजकर यांच्या हजेरीमुळे उलटसुलट चर्चा सुरू होत आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMaratha Reservationमराठा आरक्षणVijay Karanjkarविजय करंजकर