शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दुर्धर आजारही दिव्यांगांच्या श्रेणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 01:48 IST

महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियमानुसार ५ टक्के निधी अपंगांसाठी राखून ठेवण्याची तरतूद आहे. एवढीच काय ती माहिती समाजाला, दिव्यांगांना आणि बहुतेक प्रशासकीय यंत्रणेला माहिती असावी, असेच दिसते. नवीन दिव्यांग कायद्यानुसार दिव्यांगांच्या कक्षेत दुर्धर आजारांचाही समावेश करण्यात आला आहे.

जागतिक अपंग दिन

नाशिक : महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियमानुसार ५ टक्के निधी अपंगांसाठी राखून ठेवण्याची तरतूद आहे. एवढीच काय ती माहिती समाजाला, दिव्यांगांना आणि बहुतेक प्रशासकीय यंत्रणेला माहिती असावी, असेच दिसते. नवीन दिव्यांग कायद्यानुसार दिव्यांगांच्या कक्षेत दुर्धर आजारांचाही समावेश करण्यात आला आहे. याची माहिती समाजापर्यंत पोहोचलेलीच नाही.नव्या कॅटेगरीनुसार योजनांनी पुनर्रचना होणे अपेक्षित असताना प्रशासकीय यंत्रणेला मात्र याबाबतची कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या पाच टक्के निधीतून २५ प्रकारच्या योजना राबविता येतात हेच ज्या यंत्रणेला माहीत नाही तेथे दुर्धर आजारातील दिव्यांग कोणते? हे कसे माहीत असणार. आधी अंध, अपंग, मूकबधिर व मतिमंद यांचाच समावेश होता. परंतु आता कुष्ठरोग, अ‍ॅसिड अ‍ॅटक महिला, बुटकेपणा, लकवाग्रस्त आदींचा समावेश आहे. परंतु अशा रु ग्णांना त्यांचा दिव्यांग प्रवर्गात समावेश झाला आहे ही माहिती नसल्याने ते अपंगत्वाच्या लाभापासून आणि योजनांपासून वंचित आहेत. किंबहुना त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचविल्या जात नसल्याने असे असंख्य दिव्यांग अनभिज्ञ आहेत. जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तींची संख्या सुमारे ६० हजारांच्या जवळपास आहेत. परंतु अजूनही दिव्यांगांच्या संदर्भातील हक्क आणि अधिकाराबाबत अपेक्षित जनजागृती झालेली नाही.शहरामध्ये यासाठी दिव्यांगबांधव एकत्र येऊन लढा देतात, परंतु ग्रामीण भागात तर परिस्थिती भीषण आहे. त्यामुळे दिव्यांग असणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी अतिशय बारकाईने सेवा सुविधा देण्यात आल्या पाहिजे.केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्तींच्या न्याय हक्कासाठी दिव्यांग कायदा २०१६ साली केला आहे. यात अनेक अधिकार बहाल केले आहेत. मात्र, हे अधिकार समाजातील दिव्यांगांपर्यंत पोहोचत नाही. ग्रामीण भागात तर दिव्यांग व्यक्ती खरोखर योजनांपासून वंचित असल्याचे दिसते. दिव्यांगांच्या तक्रारी सोडविण्यासाठी राज्य सरकारने परिपत्रक काढून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून नेमले आहे. ज्या दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्यास ते ग्रामसेवकांच्या विरुद्ध तक्रारी करू शकतात.- बबलू मिर्झा, अध्यक्ष, दिव्यांग कल्याणकारी संघटना

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिक