इंदिरानगर : इंदिरानगरसह परिसरात अद्यापही दूषित पाणीपुरवठा होत असल्याने घसा व पोटाचे विकार वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कलानगर, सार्थकनगर, शास्त्रीनगर, परबनगर, कमोदनगर, पाटील गार्डन, जिल्हा परिषद कॉलनी, सिद्धिविनायक सोसायटी, मोदकेश्वर कॉलनी, अरुणोदय सोसायटी, मानस कॉलनीसह परिसरात गढूळ आणि मातीमिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे जुलाब, उलट्या आणि थंडी-ताप असे आजार वाढले आहेत. पाणी गढूळ येत असल्याने पाणी गाळून घ्यावे लागत आहे. अनेक वेळेस तक्रार करूनही पाणीपुरवठा विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. (वार्ताहर)
दूषित पाण्यामुळे वाढले आजार
By admin | Updated: August 6, 2015 00:31 IST