शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

वीज कर्मचारी पतसंस्थेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:53 IST

महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशन सभासदांच्या सहकारी पतसंस्थेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने त्यानिमित्ताने वर्षभर आयोजित करण्यात येणारे उपक्रम व कार्यक्रम ठरविण्याबाबत बैठक घेण्यात येऊन संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला.

एकलहरे : महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशन सभासदांच्या सहकारी पतसंस्थेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने त्यानिमित्ताने वर्षभर आयोजित करण्यात येणारे उपक्रम व कार्यक्रम ठरविण्याबाबत बैठक घेण्यात येऊन संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला.नाशिक जिल्ह्यातील वीज कर्मचारी सभासदांची संख्या एक हजाराच्या जवळपास आहे. संस्थेच्या वतीने मुलांचे उच्च शिक्षण, स्वत:चे घर अथवा प्लॉट घेण्यासाठी, मुला-मुलींच्या लग्नासाठी पाच ते दहा लाखांपर्यंतची मदत केली जाते.संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी व्ही. डी. धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी उपसरचिटणीस अरुण म्हस्के, सुभाष काकड, पंडितराव कुमावत, डी. आर. दाते, दत्ता चौधरी, बाळासाहेब गोसावी, भास्कर लांडगे, शरद देवरे, दीपक गांगुर्डे उपस्थित होते. यावेळी संस्थेचा सुवर्णमहोत्सव दिमाखात व थाटामाटात साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरले. कार्यक्रमाचे ठिकाण निश्चित करणे, नाशिक शहरातून शोभायात्रा काढणे, श्रमिक-कष्टकरी चळवळीतील शाहिरी गीतांचे आयोजन, सन १९८१ पासून संस्थेवर कामकाज केलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार, सभासदांना भेटवस्तू देणे या विविध विषयांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली. बैठकीस नरेंद्र कांबळे, एम. एन. लासुरकर, दिलीप घोडे, रोहिदास पवार, आर. जी. ताजनपुरे, बाजीराव सगभोर, महेश पाचपांडे, प्रमोद घुले, पी. एस. डोळस, एस. के. भोर, एस. आर. मालुंजकर, उत्तम गांगुर्डे, बापू गोराणे, श्रीमती ए. एस. काशिद यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.त्याचबरोबर अपघात किंवा अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना आठ लाखांची मदत, दीर्घ आजाराने सभासदाचा मृत्यू झाल्यास एक लाखाची मदत देण्यात येते. आर्थिक दुर्बल घटकातील शालेय मुला-मुलींना गणवेश, दप्तर, पुस्तके, शालेय साहित्यासाठी शंभर मुला-मुलींसाठी एक लाखांचा निधी खर्च केला जातो.

टॅग्स :Nashikनाशिक