शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नैराश्यमुक्तीसाठी चर्चा आवश्यक : चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:50 IST

काही वेळा एखादे आजारपण झाले की आजारपणानंतर आलेल्या शारीरिक दुर्बलतेतून मानसिक स्वास्थ्यही बिघडते. स्वत:च्या शक्तीवरचा, क्षमतेवरचा विश्वास उडतो. भीती वाटते, वेदनांची, मृत्यूची भीती आणि मनातल्या मनात कुढणे, जगाशी संपर्क नकोसा वाटणे, कोणाशी संवाद साधणे नकोसे होणे, व्यायामाबाबत व योग्य आहाराबाबत उदासीनता, स्वत:च्या परावलंबी असण्याबद्दलची खंत, त्रास, चिंता आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्याबद्दल निरुत्साह यासाठी नैराश्य आलेल्या व्यक्तीने आपल्या जवळच्या व्यक्त्ािंसोबत चर्चा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. धनंजय चव्हाण यांनी केले.

नाशिक : काही वेळा एखादे आजारपण झाले की आजारपणानंतर आलेल्या शारीरिक दुर्बलतेतून मानसिक स्वास्थ्यही बिघडते. स्वत:च्या शक्तीवरचा, क्षमतेवरचा विश्वास उडतो. भीती वाटते, वेदनांची, मृत्यूची भीती आणि मनातल्या मनात कुढणे, जगाशी संपर्क नकोसा वाटणे, कोणाशी संवाद साधणे नकोसे होणे, व्यायामाबाबत व योग्य आहाराबाबत उदासीनता, स्वत:च्या परावलंबी असण्याबद्दलची खंत, त्रास, चिंता आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्याबद्दल निरुत्साह यासाठी नैराश्य आलेल्या व्यक्तीने आपल्या जवळच्या व्यक्त्ािंसोबत चर्चा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. धनंजय चव्हाण यांनी केले.नाशिक सायक्रियास्ट्रिक सोसायटीतर्फे शनिवारी (दि.२३) कुसुमाग्रज स्मारकात ‘डिप्रेशन : समज व गैरसमज’ याविषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी नैराश्य येण्याची कारणे व त्याविषयी करण्यात येणाऱ्या उपायांविषयी मार्गदर्शन केले. नेहमी ज्या गोष्टी करतो त्याविषयी रुची नसणे, मनात आत्महत्येचे विचार येणे यामुळे नैराश्य अजूनच बळावतो. तसेच नैराश्य आलेल्या व्यक्ंितनी आपल्या जवळच्या व्यक्तिंच्या सहवासात राहणे आवश्यक आहे. लहानसहान घटना मनाला लावून घेणे, बदलत्या काळासोबत स्वत:ला बदलण्याची तयारी नसणे व त्यातून आलेले वैफल्य, रिकाम्या वेळाचा वापर कसा करायचा हे न कळल्यामुळे मनाचा हट्टीपणा या आणि अशा अनेक गोष्टी नैराश्याची भावना घट्ट करत जाऊ शकतात. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी अशा व्यक्तीने बोलून मनमोकळे करणे आवश्यक आहे.तसेच त्या व्यक्ंितच्या जवळच्या माणसांनीही त्याला आधार देऊन त्याला समजून घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमप्रसंगी आयोजक गिरीश पगारे, राजीव ठाकरे, अभिजीत पाटील, शिरीष सहस्त्रबुद्धे, अशोक पवार, पा. भा. करंजकर आदी उपस्थित होते.ही आहेत लक्षणेएखाद्याला नैराश्य येण्याचे प्रमुख लक्षणांमध्ये त्या व्यक्तीला थकवा येणे, निरुत्साह वाटणे, भूक कमी किंवा जास्त लागणे, उदास वाटणे, चिडचिड होणे, झोप कमी किंवा जास्त येणे, आत्मविश्वास गमावणे, चुका करण्याची भीती वाटणे, कामात लक्ष न लागणे, निर्णयक्षमता गमावणे तसेच प्रमुख लक्षणे म्हणजे मनात आत्महत्येचा विचार येणे असे लक्षणे नैराश्य आलेल्या व्यक्तीला येत असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिक