शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाट्य परिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:47 IST

नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेची निवडणूक केव्हा होणार? या मुद्द्यावर झालेल्या साधकबाधक चर्चेनंतर नाट्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली.

नाशिक : नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेची निवडणूक केव्हा होणार? या मुद्द्यावर झालेल्या साधकबाधक चर्चेनंतर नाट्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली.कालिदास कलामंदिरातील परिषदेच्या कार्यालयात सर्वसाधारण सभा प्रारंभी गणसंख्येअभावी तहकूब करण्यात आली. त्यानंतर प्रास्ताविकात प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे कामकाज अत्यंत पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे केले जात असल्याने शाखा राज्यात तृतीय क्रमांकावर असल्याचे सांगितले. राज्य नाट्य परिषदेचे अध्यक्ष यांना नाशिक शाखेचा अहवाल आणि आॅडिटसह सर्व बाबी पाठविण्यात आल्यानंतर अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी पत्र पाठवून नाशिकची निवडणूक कधी घ्यायची ते तुम्हाला कळवले जाणार असून, त्यानंतरच निवडणूक घेण्याचे निर्देश दिले असल्याचे ढगे यांनी सांगितले.अध्यक्ष रवींद्र कदम यांनी सदस्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण केले. राजेश भुसारे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडण्यासह इतिवृत्ताचे वाचन केले. ईश्वर जगताप यांनी विषयपत्रिकेवरील विविध विषयांचे वाचन केले. रवींद्र ढवळे यांनी निवडणुकीबाबतचा मुद्दा उपस्थित केला. श्याम दशपुते यांनी आम्हाला निवडणूक लढवण्याची संधी का नाही? असा सवाल उपस्थित केल्यानंतर सुरेश गायधनी २०१७ साली झालेल्या घटना दुरुस्तीनुसार ७० वर्षांवरील कुणालाही पदाधिकारी बनण्यासाठी मुभा नसल्याचे नमूद केले. यावेळी सचिन शिंदे, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, विशाल जातेगावकर, अभय ओझरकर, उमेश गायकवाड, राजेंद्र जाधव, मानसी देशमुख, प्रकाश साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.तांत्रिकदृष्ट्या जुन्या घटनेनुसार विद्यमान कार्यकारिणीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत असून, त्यानंतरही जोपर्यंत राज्य शाखेकडून निवडणूक घेण्याचे आदेश येत नाहीत, तोपर्यंत कार्यकारिणी कार्यरत राहणार असल्याचे सुनील ढगे म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकNatakनाटक