शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेसच्या अभियानात धुळ्याच्या तिकिटाचीच चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 17:58 IST

सटाण्यात शुभारंभ : शेवाळेंना डावलल्यास बंडाचा इशारा

ठळक मुद्देउत्तर महाराष्ट्र प्रभारी रेड्डी यांनी मात्र धुळ्याच्या उमेदवारी बद्दल आपल्या भाषणातून बगल देण्याचा प्रयत्न केला.

सटाणा : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाशवभूमीवर कॉंग्रेसच्या जनसंपर्कअभियानचा उत्तर महाराष्ट्रचे प्रभारी चेल्लार वामसी चांद रेड्डी यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.७) सटाण्यापासून शुभारंभ करण्यात आला. मात्र या कार्यक्र मात अभियानावर चर्चा होणे अपेक्षित असतांना धुळे लोकसभा मतदार संघाच्या तिकीटाभोवतीच चर्चा रंगली. यावेळी इच्छुक उमेदवार तथा मविप्रचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांनाच तिकीट द्या अन्यथा बंड करू असा सज्जड दमच काही वक्त्यांनी दिल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.कॉँग्रेस सरकारने राज्यात गेल्या साठ वर्षात राबविलेल्या विकास योजना आणि मोदी सरकारने जनतेचा केलेला घोर विश्वासघात,राज्यात युती सरकारने जनतेची केलेली घोर फसवणूक प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी कॉंग्रेसने जनसंपर्कअभियान सुरू केले आहे. या अभियानचा शुभारंभ सटाणा येथून झाला. यावेळी कार्यक्र माच्या निमित्ताने आयोजित पदाधिकारी ,कार्यकर्त्यांच्या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये जिंकण्याच्या दृष्टीने व्यूहरचना व अभियानाच्या मूळ उद्देशावर चर्चा होणे सर्वांना अपेक्षित असतांना धुळे लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीवरच चर्चा रंगली. कॉंग्रेसचे नगरसेवक दिनकर सोनवणे यांनी थेट पक्षाच्या तालुका नेतृत्वावरच हल्लाबोल करत कार्यकारिणी बदलल्याशिवाय कोणतीही निवडणूक जिंकणे अशक्य असल्याचे सांगून धुळ्याचे तिकीट डॉ.तुषार शेवळे यांना असेल तरच प्रचार करू असा इशारा दिला. नगरसेवक सोनवणे यांच्या सुरात सूर मिसळत जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रा.अनिल पाटील यांनी देखील डॉ.शेवाळेच योग्य उमेदवार असल्याची शिफारस केली. जेष्ठ पदाधिकारी भिका रौंदळ ,गुलाबराव मगर,वीरेंद्र अहिरे यांनी तर थेट धुळे लोकसभा मतदार संघासाठी इच्छुक असलेले माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नावालाच विरोध केला. डॉ.शेवाळे यांना डावलून पाटलांना उमेदवारी दिल्यास आम्ही बंड करू असाही इशारा देण्यात आला. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी तर डॉ.शेवाळे यांच्या तिकिटासाठी उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी रेड्डी यांनाच साकडे घातले. कॉँग्रेस प्रभारींची मात्र चुप्पीउत्तर महाराष्ट्र प्रभारी रेड्डी यांनी मात्र धुळ्याच्या उमेदवारी बद्दल आपल्या भाषणातून बगल देण्याचा प्रयत्न केला. रेड्डी म्हणाले, बूथ रचनेचे काम योग्य पद्धतीने केल्यास उमेदवार कोणताही असल्यास विजय कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सूक्ष्म नियोजन करून जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून घराघरात पोहचून भावी पंतप्रधान राहुल गांधी यांचे हात बळकट करावे असे आवाहन केले.

टॅग्स :Nashikनाशिकcongressकाँग्रेस