शिक्षण समितीच्या देवळा बैठकीवरून वादंग

By admin | Published: July 8, 2014 11:16 PM2014-07-08T23:16:12+5:302014-07-09T00:55:12+5:30

सदस्याचा बहिष्कार, विरोधी गटनेत्यांची टीका

Discussion from Deola meeting of Education Committee | शिक्षण समितीच्या देवळा बैठकीवरून वादंग

शिक्षण समितीच्या देवळा बैठकीवरून वादंग

Next

 

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची मासिक बैठक देवळा येथील विद्या प्रबोधिनी विद्यालयात घेण्यावरून बरेच वादंग झाले. शिक्षण समिती सदस्य प्रा. अशोक जाधव यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला, तर भाजपा गटनेते केदा अहेर यांनी शाळेच्या आवारात बैठक घेण्यावरून शिक्षण सभापती ज्योती माळी यांच्यावर टीका केली.
शिक्षण समितीची मासिक बैठक देवळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत घेण्याचा निर्णय समिती सभापती ज्योती बाळासाहेब माळी यांनी घेतला. त्यानुसार मंगळवारी (दि.८) शिक्षण समितीची मासिक बैठक देवळा येथील पब्लिक स्कूलमध्ये घेण्यात आली. या बैठकीवर शिक्षक असलेले शिवसेनेचे सदस्य प्रा. अशोक जाधव यांनी बहिष्कार टाकला. ते दिवसभर जिल्हा परिषदेत उपस्थित होते. सदस्यांना विश्वासात न घेताच सभापती परस्पर बैठकीच्या तारखा व ठिकाण ठरवित असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. विशेष म्हणजे या बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी गेलेल्या शिक्षण सभापती ज्योती माळी व बाळासाहेब माळी यांचे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलेले स्वागतही चर्चेचा विषय ठरले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Discussion from Deola meeting of Education Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.