शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
4
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
5
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
7
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
8
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
9
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
10
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
11
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
12
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
13
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
14
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
15
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
16
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
17
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
18
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
19
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
20
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

राधाकृष्ण गमे यांच्या बदलीच्या घाईमागील संपेना चर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 2:03 AM

अखेर महापालिकेचे माजी आयुक्त राधाकृष्ण गमे यांची विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी सूत्रेही स्वीकारली. असे असले तरी ज्या घाईने आणि मावळते विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या सेवानिवृत्तीची वाट न बघता कैलास जाधव यांना महापालिकेचे आयुक्त म्हणून रुजू करण्यास धाडले आणि चार दिवस गमे यांना तिष्ठत ठेवण्यात आले, त्यातून काय साध्य झाले, अशी चर्चा आता होत आहे.

ठळक मुद्देअखेर रुजू : शासन चार दिवस थांबले असते तर महापालिकेवर कोणते आभाळ कोसळले असते?

नाशिक : अखेर महापालिकेचे माजी आयुक्त राधाकृष्ण गमे यांची विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी सूत्रेही स्वीकारली. असे असले तरी ज्या घाईने आणि मावळते विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या सेवानिवृत्तीची वाट न बघता कैलास जाधव यांना महापालिकेचे आयुक्त म्हणून रुजू करण्यास धाडले आणि चार दिवस गमे यांना तिष्ठत ठेवण्यात आले, त्यातून काय साध्य झाले, अशी चर्चा आता होत आहे.अधिकाऱ्यांच्या बदल्या आता प्रशासकीय बाब राहिलेली नाही. त्यातील राजकीय हस्तक्षेपांमुळे ती मुळातच सोईचा भाग आहे. कोणत्या राजकीय नेत्याला कधी कोणता अधिकारी जवळचा वाटेल आणि त्याची वर्णी कुठे लागेल, हे त्या त्या वेळीच ठरत असते. सध्या राज्यात कोरोना काळ संपलेला नसतानाही ज्या वेगाने शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत ते बघता या बदल्यांमागील गणिते वेगळीच असल्याचीदेखील चर्चा सुरू असते.राधाकृष्ण गमे यांच्या बाबतीत असेच काही घडले आहे. तुकाराम मुंढे यांच्या वादग्रस्त बदलीनंतर त्यांची नाशिक महापालिकेत १५ डिसेंबर २०१८ रोजी नियुक्ती झाली आणि त्यांनी सारे स्थिरस्थावर केले. अगदी स्वच्छ सर्वेक्षण आणि स्मार्ट सिटीत मुंबई, पुण्याला मागे टाकून जी चमकदार कामगिरी केली, त्यातून नाशिकमध्ये अगदी कोरोना संकटकाळातदेखील राज्यात नाशिकची छाप पडली. कोरोनाचे तर महासंकट नाशिकला आव्हान ठरत असताना जोखीम पत्करून अधिकाधिक चाचण्यांनी बाधितांच्या संख्येत वाढ होईल हे ठाऊक असतानादेखील गमे यांनी काम वेगाने पुढे नेले. मात्र, कुठेतरी माशी शिंकली आणि २६ आॅगस्ट रोजी कैलास जाधव यांची नाशिक महापालिकेत नियुक्ती करण्यात आली. गमे यांना कुठेही नियुक्ती देण्यात आली नसली तरी त्यांना नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यामुळे त्यानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली.नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने हे नियत वयोमानाने तसे ३१ आॅगस्ट रोजी निवृत्त होणारच होते, तर मग गमे यांची त्या आधी चार दिवस अगोदर घाईघाईने बदली करण्याचे कारण काय? गमे यांच्या कारकिर्दीच्या चार दिवसात असा कोणता उलटफेर होणार होता की, जाधव यांची नियुक्ती झाली आणि त्यांनी दुसºया दिवशी तडक नाशिकमध्ये कार्यभारदेखील स्वीकारला. गमे यांना चार दिवस प्रतीक्षेत ठेवून मग नाशिकलाच नियुक्ती देण्यात आली. परंतु चार दिवस अगोदर बदली करण्यामुळे संंबंधित उच्चपदस्थांच्या अंतस्थ हेतूची यानिमित्ताने चर्चा होत आहे.मनपा आयुक्त आणि कार्यकाळनाशिक महापालिकेत तसे तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याचे भाग्य अत्यंत अपवादानेच अधिकाºयांना मिळाले आहे. चांगले काम केल्यानंतरदेखील पूर्ण काळ मिळतोच असे नाही. सनदी अधिकाºयांच्या बदल्यांमागे फोर्स वगळेच असतात. आणि कित्येकदा तर अधिकाºयांचे आपसातील संघर्षही कारणीभूत ठरतात. गमे यांच्या बदलीमागे राजकीय हस्तक्षेपाबरोबरच प्रशासकीय संघर्षदेखील चर्चेत आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारRadhakrishna Gameराधाकृष्ण गमेTransferबदली