शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

रखडलेल्या प्रश्नांबाबत  भुजबळ यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:22 AM

जिल्ह्णातील पाणीटंचाई, वीजपुरवठा, खरीप पीककर्ज, बियाणे, खते पुरवठा यांसह जिल्ह्णातील सिंचनाच्या व इतर रखडलेल्या प्रश्नांबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची शुक्रवारी (दि. १५) भेट घेऊन चर्चा केली.

नाशिक : जिल्ह्णातील पाणीटंचाई, वीजपुरवठा, खरीप पीककर्ज, बियाणे, खते पुरवठा यांसह जिल्ह्णातील सिंचनाच्या व इतर रखडलेल्या प्रश्नांबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची शुक्रवारी (दि. १५) भेट घेऊन चर्चा केली. नागरिकांच्या मागण्यांसंबंधी कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन त्यांनी याप्रसंगी जिल्हाधिकाºयांना दिले.  छगन भुजबळ यांनी जिल्ह्णातील विविध प्रश्नांवर जिल्हाधिकाºयांशी चर्चा करताना येवला, नांदगाव, सिन्नर, चांदवड या अवर्षप्रवण तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याबाबत गावांमध्ये मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरविण्याची मागणी करीत ३० जूनपर्यंत असलेली टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मुदत पावसाने ओढ दिल्यास वाढवून मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची सूचनाही केली. तसेच वीज वितरण कंपनीकडून जळालेले रोहित्र बदलून देण्यात होत असलेली दिरंगाई आणि अनियमित वीजकपातीविषयी नागरिकांमध्ये रोष असल्याचेही त्यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. वनहक्क कायद्याअंतर्गत वनजमिनींबाबत प्रलंबित प्रकरणांमध्ये कार्यवाही करून आदिवासींना त्यांचा हक्क मिळवून द्यावा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले तसेच जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणांवर कारवाई करून दाखले वितरित करण्याच्या मागणीसोबतच मांजरपाडा वळण योजना, पुणेगाव दरसवाडी यासह रखडलेले जलसंधारण व सिंचन प्रकल्प, रस्ते प्रकल्पांसह भूसंपादनाअभावी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचेही भुजबळ यांनी प्रशासनाला सुचवले आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी या सर्व प्रश्नांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी खासदार देवीदास पिंगळे, खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयवंत जाधव, आमदार सुधीर तांबे, अपूर्व हिरे, नरहरी झिरवाळ, पंकज भुजबळ, दीपिका चव्हाण, माजी आमदार दिलीप बनकर, शिरीष कोतवाल, श्रीराम शेटे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अर्जुन टिळे, विष्णुपंत म्हैसधुणे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, निवृत्ती अरिंगळे, अ‍ॅड. चिन्मय गाढे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.‘लोकमत’च्या वृत्ताची घेतली दखल खरीप हंगामासाठी शेतकºयांना पुरेसे पीककर्ज उपलब्ध करून देण्यासह बी-बियाणे तसेच रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली. लोकमतने ‘खरिपाची तयारी’ या वृत्तमालिकेअंतर्गत १४ मे २०१८ रोजी ‘शेती कर्जाचे लक्ष्य हजार कोटींनी घटले’ या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत भुजबळ यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षात नाशिक जिल्ह्णातील शेतकºयांना खरीप कर्जासाठी दोन हजार कोटींची गरज असताना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केवळ ५०० कोटींचेच कर्जवाटपाचे लक्ष्य ठेवल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. खरिपाच्या लागवडीसाठी शेतकºयांना राष्ट्रीयीकृत बँका, पतसंस्था अथवा खासगी सावकारांचे उंबरठे झिजविण्याची वेळ येणार असल्याने पुरेशा कर्जवाटपासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळ