पाटोदा : विखरणी येथील व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून दहा तरुणांनी केलेला अवयवदानाचा संकल्प आज पाटोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आॅनलाइन फॉर्म भरून तडीस नेला.विखरणी येथील सुनील खरे यांनी विखरणी युवा मंच या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अवयवदान करण्याबाबत आवाहन करून माहिती दिली होती. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील दहा तरुणांनी अवयवदान करण्यासाठी तयारी दर्शविली. येथील चंदन खताळ यांनी ग्रामसभेत अवयवदानाबद्दल माहिती दिली होती. येथील बापूसाहेब शेलार, गोरख अहिरे, सोमनाथ खरे, संजय अहिरे, गोरख शेलार, अमोल शेलार, पुंडलिक कदम, सुनील खरे, महेश गोडसे, दिलीप रायसोनी इत्यादींनी फॉर्म भरून अवयवदान केले.
दहा तरुणांचा अवयवदानाचा संकल्प विखरणी : स्वयंस्फूर्तीने सहभागी होणारे पहिलेच गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:50 IST