शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अविश्वास टळला,  आता बदलीची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:43 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर दाखल झालेल्या अविश्वास ठरावामुळे निर्माण झालेला जनक्षोभ थांबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून विशेष महासभा थांबविली आणि पक्षाची प्रतिमाही जपली

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर दाखल झालेल्या अविश्वास ठरावामुळे निर्माण झालेला जनक्षोभ थांबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून विशेष महासभा थांबविली आणि पक्षाची प्रतिमाही जपली खरी; परंतु आता मुंढे यांच्या बदलीची शक्यता वर्तविली जात असून, त्यासाठी मुंबई महापालिकेपासून एमएमआरडीए पर्यंत अनेक पर्यायांची चर्चा सुरू आहे.  राज्यात आणि महापालिकेत पूर्णत: भाजपाची सत्ता असतानादेखील नाशिकमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. त्यामुळे शहरात हा चर्चेचा विषय ठरला होता. राज्य शासन आयुक्तांची बदली करू शकत असताना दाखल झालेल्या या अविश्वास प्रकारामुळे जाणकारांमध्ये चर्चेचा विषय ठरला. अविश्वास दाखल झाल्याने नाशिकमध्ये मुंढे समर्थक वाढले आणि सोशल मीडियावरील चळवळीची परिणती वॉक फॉर कमिशनरमध्ये रूपांतर झाले. जनक्षोभ टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश दिले असले तरी नाशिक भाजपामध्ये एकंदरच मुंढे यांच्या विरोधात असलेला रोषही व्यक्त झाला. त्यामुळे आयुक्तांची बदली होऊ शकते असेही सांगितले जात असून, ११ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक बदल्यांना सामोरे गेलेल्या मुंढे यांना हे सारेच अवगत आहे. त्यामुळे आता मुंढे यांना पुढील काळ सुकर जाणार की बदलीला सामोरे जावे लागणार याविषयी चर्चा होत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे