येवला : तालुक्यातील बाभूळगाव खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच रुपेश वाबळे यांच्याविरु द्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला असून, अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी ११ पैकी ८ सदस्यांनी तहसीलदार शरद मंडलिक यांना दिलेल्या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. येथील सरपंच कामकाज करताना कोणत्याही सदस्यांना विश्वासात घेत नाही. सरपंच स्वत: असूनही विकास कामात अडथळे निर्माण करतात. सरपंच रु पेश वाबळे असताना प्रत्यक्ष कामकाज त्यांचे वडील प्रभाकर वाबळे हेच करत असतात व विनाकारण दबाव तंत्राचा वापर करतात. ही कारणे देत ग्रामपंचायत सदस्य देवीदास निकम, वंदना भालेराव, सुनीता चव्हाण, विकास साताळकर, मैनाबाई भगत, संदिप वाबळे, मीराबाई आहिरे, सिमा लोंढे या सदस्यांनी अविश्वास मांडला असून या ठरावावर विचार करण्यासाठी तहसिलदार शरद मंडलिक यांनी २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता बैठक घेणार असल्याचे कळविले आहे.
बाभूळगाव सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव
By admin | Updated: July 23, 2016 00:35 IST