शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा बाजार समिती सभापतींविरोधात अविश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 01:49 IST

सटाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिनविरोध झालेल्या सभापती मंगला प्रवीण सोनवणे यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून धुसफूस सुरू होती, आता त्यांच्यावर अविश्वास ठरावाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. तब्बल बारा संचालक अज्ञातस्थळी रवाना झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे

सटाणा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिनविरोध झालेल्या सभापती मंगला प्रवीण सोनवणे यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून धुसफूस सुरू होती, आता त्यांच्यावर अविश्वास ठरावाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. तब्बल बारा संचालक अज्ञातस्थळी रवाना झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहेयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीची वर्षभरापूर्वीच निवडणूक झाली. शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर राज्यात झालेली ही पहिलीच निवडणूक ठरली. सातबाराधारकांनी निवडून दिलेल्या संचालकांमधून सभापतीपदी मंगला प्रवीण सोनवणे यांची निवड करण्यात आली. बाजार समितीच्या आतापर्यंतच्या इतिहासात सभापतिपदी प्रथमच महिलेला संधी मिळाली; मात्र वर्ष पूर्ण होण्याच्या आतच संचालक मंडळातील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे. एवढेच नव्हे तर बारा ते चौदा संचालकांनी एकत्रित येत अविश्वास ठरावाच्या हालचाली सुरू केल्याने सहकार वर्तुळात खळबळ उडाली आहे. अठरापैकी १२ ते १३ संचालक अज्ञातस्थळी रवाना झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. उर्वरित संचालकांपैकी काही त्या गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. सभापती सोनवणे यांच्या घरात विवाह समारंभ असल्याने संपूर्ण कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून विवाहाच्या तयारीत होते. याच गोष्टीचा फायदा उचलत विरोधकांनी संचालकांची मोट बांधल्याचे बोलले जाते. साहजिकच त्यामुळे याविषयीचे गूढ वाढले आहे. लोकसभा निवडणुकीत गटातटाचे उफाळून आलेले राजकारण आणि सोनवणे कुटुंबीयांना राजकारणातील पूर्वानुभवाचा अभाव यामुळे विरोधकांना ही संधी मिळाल्याचे बोलले जात आहे. अर्थात तरीही अविश्वास ठराव आणण्यामागील नेमके कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. सभापतिपदाच्या निवडीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली झाल्याचे बोलले गेले होते. 

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती