शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या पदरी निराशा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 18:22 IST

खेडलेझुंगे : शासनाच्या कृषी विभागाकडुन सर्व शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षाची कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु केल्याची माहीती देण्यात आलेली होती. यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्ट्रर, ट्रॅक्टर चलीत औजारांमध्ये रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, गर, कापणी यंत्र, फवारणी यंत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ शेतकºयांना लॉटरी पध्दतीने मिळणार आहे.

ठळक मुद्देकृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत नोंदणीसाठी रीघ

खेडलेझुंगे : शासनाच्या कृषी विभागाकडुन सर्व शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षाची कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु केल्याची माहीती देण्यात आलेली होती. यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्ट्रर, ट्रॅक्टर चलीत औजारांमध्ये रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, गर, कापणी यंत्र, फवारणी यंत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ शेतकºयांना लॉटरी पध्दतीने मिळणार आहे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या आणि यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरलेल्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानासाठी लाभार्थी शेतकºयांची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.यंत्र आणि अवजारे खरेदीसाठी भरपूर अनुदान मिळत असल्याने शेतकºयांसाठी ही योजना वरदान ठरत आहे. ह्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करणे आवश्यक असते. त्यासाठी शासनाने पोर्टल सुरू केले आहे. मात्र हे पोर्टलच व्यवस्थित कार्यान्वीत न झाल्याने शेतकºयांची नोंदणी प्रक्रि या ठप्प झाली आहे. त्यातच शालेय विद्यार्थी आणि इतर योजनांची आॅनलाईन कामकाजाही लोड सीएससी सेंटर आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये आहे. त्यातच कृषी विभागाची साईट अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याने सेंटर चालक वैतागलेले आहेत.सरकारने शेतकºयांसाठी कृषी विभागाकडून यांत्रिकीकरण योजना सुरू केल्यापासून अनेकवेळा पोर्टलच्या कनेक्टिव्हिटीत अडथळा उद्भवत असून अर्ज दाखल करून घेणे अशक्य ठरत असल्याने आम्ही सर्व केंद्र चालक अक्षरश: हैराण झालो आहोत. सेंटरवर / ग्रामपंचायतीमध्ये शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. सद्या सुरु असलेल्या कोरोनाच्या पाशर््वभुमीवर संबंधित विभागाने याची दखल घेऊन ही अडचण लवकर दूर करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.- विशाल घोटेकर, सीएससी केंद्र संचालक, खेडलेझुंगे.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आॅनलाईन भरण्यासाठीची पध्दत शासनाकडुन खरोखरच कौतुकास्पद आहे. परंतु त्यासाठी जी काही यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे ती अत्यंत कुचकामी आहे. आॅनलाईन फॉर्म भरण्यासाठी दिवस-दिवस सीएससी सेंटरवर, ग्रामपंचायतीमध्ये बसुनही अर्ज आॅनलाईन होत नसल्याने शेतकरी त्रस्त होत आहे. कोरोनाची महामारी व सद्या पडत असलेल्या सततच्या पाऊसामुळे आधीच शेतकरी अडचणीत असताना ही शेतकरी हिताच्या योजनाच्या अंमलबजावणीबाबत सरकारची उदासीनता दिसून येते ही निश्चित खेदाची आणि चिंताजनक बाब आहे.- रामदास गोरडे, शेतकरी.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार