शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

पावसाने हुलकावणी दिल्यामुळे निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 15:10 IST

देवळा : परतीच्या पावसाकडे डोळे लाउन बसलेल्या शेतकऱ्यांची, पावसाने हुलकावणी दिल्यामुळे निराशा झाली असून देवळा तालुक्यावर भिषण दुष्काळाच्या छाया पसरू लागल्या आहेत.सर्व तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देतालुक्याच्या पूर्व भागात खरीपाची पीके देखील हातातून गेल्यामुळे तेथील परिस्थिती गंभीर झाली असून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. रब्बीचा हंगाम घेण्याच्या आशा देखील आता मावळल्या आहेत. देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी नागरीक करीत आहेत.

देवळा : परतीच्या पावसाकडे डोळे लाउन बसलेल्या शेतकऱ्यांची, पावसाने हुलकावणी दिल्यामुळे निराशा झाली असून देवळा तालुक्यावर भिषण दुष्काळाच्या छाया पसरू लागल्या आहेत.सर्व तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.तालुक्यात पावसाळयाच्या पूर्वार्धात पडलेल्या थोड्याफार पावसावर शेतकº्यांनी खरिपाच्या पीकांची पेरणी केली. नंतर मात्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे पूर्व भागातील शेतकº्यांनी खरीपाची पीके सोडून दिली. या वर्षी चणकापूर उजव्या कालव्याला सोडलेल्या पूर पाण्यामुळे कालव्याच्या लाभक्षेत्रात येणार्या वरवंडी, मटाणे,वाजगाव, रामेश्वर आदी गावांना खरीपाच्या पीकांना लाभ झाला. तेच पाणी पुढे रामेश्वर धरणातून वाढीव कालव्याद्वारे उमराणा येथील परसूल धरणापर्यंत नेण्यात यश आले.या कालव्यालगत असलेल्या वाखारी, पिंपळगाव ( वा ), खुंटेवाडी,वाखारवाडी, सुभाषनगर, दहिवड, आदी गावातील छोटेमोठे बंधारे, धरण भरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. परंतु चणकापूर उजव्या कालव्याची कमी वहन क्षमता, पाण्याची होणारी गळती व चोरी, तसेच तालुक्यातील कमी पर्जन्यमानामुळे, पुरेसे पाणी कोणालाच मिळाले नाही.तालुक्यातील जनतेची पाण्याची मागणी पाहता हे पाणी अपुरे पडत आहे. चणकापूर उजव्या कालव्याची वहन क्षमता वाढविणे, चणकापूर येथे म्हशाड नाल्याचे पाणी कालव्यात टाकणे, वाढीव कालव्याचे पाणी झाडी एरंड गावपर्यंत नेणे हि आश्वासनेनेत्यांनी पूर्ण करून जनतेला दिलासा द्यावा अशी अपेक्षा तालुक्यातील जनतेने व्यक्त केली आहे.दुष्काळाचा सामना करण्यासाठी महसूल विभागाने आतापासूनच तालुक्यात गावागावातील पाणी पुरवठा योजना अवलंबून असलेल्या धरण, पाझर तलाव, बंधारे आदींमधील पाणी पिण्यासाठी आरिक्षत करून त्यात सुरू असलेले अवैध विजपंप वीज कंपनी, पोलिस यांची मदत घेउन बंद करावे अशी मागणी नागरीक करीत आहेत. शासनाने वेळीच योग्य ती उपाययोजना केली नाही तर फेबुवारी महीन्यातच पाण्याचे हे सर्व स्त्रोत कोरडे होउन जनतेला तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे..दहिवड येथील चिंचलवण पाझरतलाववाढीव कालव्याद्वारे भरून देण्यात आला आहे. शेतकरीया तलावातील पाणी टँकरने भरून फळबागा वाचिवण्यासाठी प्रयत्न करीन आहेत. लगतचे शेतकरी यास विरोध करत असल्यामुळे पाण्यासाठी आतापासूनच वादाविवाद सुरू झाले आहेत. यावरून आगामी काळातील दुष्काळाबाबत वेळीच सावध होउन शासनाने आतापासूनच पाणी साठे आरक्षित करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.