शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय

By admin | Updated: September 22, 2015 00:13 IST

तक्रार : आरोग्याधिकारी गैरहजर; रुग्णांना पाहावी लागते वाट

घोटी : दुर्गम आदिवासी भागातील ग्रामीण आरोग्य सेवेचे दुखणे थांबण्याऐवजी वाढतच असल्याचा प्रत्यय येत आहे. इगतपुरी तालुक्यातील आदिवासी भागातील महत्त्वपूर्ण आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवा कोलमडली आहे. वैतरणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन दिवसापासून वैद्यकीय अधिकारी रजेच्या नावाखाली गायब असल्याचा फटका रोज १००च्या वर रुग्णांना बसत असूनही यंत्रणा बेफिकीर असल्याचे दिसत आहे. रजा कालावधीत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी नेमणूक दिलेले वैद्यकीय अधिकारी बैठकीच्या नावाखाली गायब असल्याचे दिसून आले. इगतपुरी तालुका आरोग्य कार्यालयाच्या बेफिकिरीमुळे गेल्या महिन्यात आरोग्य सेवेचा बोजवारा उडालेला होता. तो कायम असल्याची प्रचिती आज दिसून आल्याने आरोग्य खात्याची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.इगतपुरी तालुक्याच्या अतिशय दुर्गम आदिवासी भागातील वैतरणा प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या दोन दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी आलेच नसल्याची गंभीर बाब श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांना समजली. त्यांनी त्या ठिकाणी स्वत भेट दिली असता शंभरपेक्षा जास्त विविध स्त्री-पुरूष रुग्णांची गर्दी दिसून आली. त्यांनी अधिक चौकशी केली असता गेल्या २ दिवसांपासून येथील वैद्यकीय अधिकारी आलेच नसल्याची माहिती मिळाली. ते स्वत शासनाच्या जिल्हा आरोग्य समितीचे सदस्य असल्याने त्यांनी तातडीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. वैद्यकीय अधिकारी रजेवर असून नविन वैद्यकीय अधिकारी येतील असे उत्तर त्यांना देण्यात आले. तथापि दिवसभर वाट पाहून कोणीही वैद्यकीय अधिकारी आलेच नसल्याने सर्व रुग्णांची मोठी गैरसोय झाली. परत संपर्क करूनही त्यांना उडवाउडवीची उत्तरे ऐकायला मिळाली. आरोग्य क्षेत्रातील ज्ञान नसणाऱ्या कर्मचारी लोकांकडून तात्पुरता उपचार करून घेण्याची अफलातून सुचना त्यांना ऐकायला मिळाली. (वार्ताहर)