शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

सुविधांपासून अपंग बांधव उपेक्षितच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 11:36 PM

ओझर : आजही अनेक शासकीय इमारतीत अपंगांसाठी रॅम्प-लिफ्ट नाही, व्हीलचेअर उपलब्ध नाही. शासकीय कार्यालयांत अपंगांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी मदत केंद्र अथवा तशी व्यवस्था नसल्याने केंद्र सरकारचे सुगम्य भारत अभियान सपशेल अपयशी ठरले आहे.

ठळक मुद्देशासकीय योजनांपासून वंचित : तालुकानिहाय दाखले वाटप केंद्रांची मागणी

सुदर्शन सारडा।ओझर : आजही अनेक शासकीय इमारतीत अपंगांसाठी रॅम्प-लिफ्ट नाही, व्हीलचेअर उपलब्ध नाही. शासकीय कार्यालयांत अपंगांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी मदत केंद्र अथवा तशी व्यवस्था नसल्याने केंद्र सरकारचे सुगम्य भारत अभियान सपशेल अपयशी ठरले आहे.शासकीय रु ग्णालयात अपंगांना योग्य आरोग्य सेवासुविधा मिळत नाही. आज सर्वत्र जागतिक अपंग दिन साजरा केला जात असताना त्यांना समाजाकडून जास्तीत जास्त मदत आणि सरकारकडून अधिक सोयीसुविधा मिळाल्या तर आजचा दिवस त्यांच्यासाठी उद्याची नवस्वप्ने घेऊन येणारा असेल. अपंगांना अपंगत्वाच्या दाखल्यापासून तर एखादी सरकारी योजना पदरात पाडून घेणे जिकिरीचे ठरत असताना पावलोपावली होणारी त्यांची हेळसांड कधी थांबेल, असा सवाल अपंग बांधव नेहमीच करत असतात.दर बुधवारी व शुक्रवारी जिल्हास्तरीय कॅम्प आयोजित केला जातो. त्रिसदस्यीय समितीने चाचणी केल्यानंतर अपंगत्वाचा दाखला दिला जातो. त्यानंतर सदर व्यक्ती अपंग असल्याचे सिद्ध होते. मात्र कॅम्पला जाणाऱ्या अनेक अपंगांना अनेकदा दिवसभर रेंगाळत बसावे लागते. गर्दीमुळे काम न होताच माघारी फिरावे लागते. सदर जिल्हास्तरावरील खेट्या तालुकास्तरावर येणे गरजेचे आहे. वाढत्या महागाईचा विचार करता सध्याची उत्पन्न दाखल्याची वार्षिक वीस हजार रुपयांची अट एक लाख रुपये करण्यात यावी. अपंगांना सार्वजनिक सुविधेबरोबरच शौचालय अनुदान मिळाले पाहिजे. अल्पव्याजदर आकारून कर्जवाटप केल्यास उद्योग-व्यवसाय करण्यात अपंगांना मदत होईल. याबरोबरच कागदोपत्रांची जुळवाजुळव करताना व त्यापासून होणाºया त्रासामुळे आजही अनेकजण शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. अपंगत्वाचा दाखला देण्याची परवानगी जिल्ह्यात नाशिक जिल्हा रु ग्णालय आणि मालेगाव येथील उपजिल्हा रु ग्णालय अशा दोनच ठिकाणी आहे. आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने नाशिक शहरातील झाकीर हुसेन व बिटको रु ग्णालयाला ही परवानगी दिली आहे. परंतु ग्रामीण भागातील जनतेला शहरात येण्यास होणारी अडचण लक्षात घेता तालुकानिहाय दाखले वाटप केले तर अधिक उपयुक्त ठरेल असे काही अपंग बांधवांचे म्हणणे आहे.अपंग बांधवांना आजही शासकीय कार्यालयात अधिकारी-कर्मचाºयांकडून सौजन्याची वागणूक मिळत नाही. काम घेऊन आलेल्या अपंगांकडे दुर्लक्ष केले जाते. साहजिकच अपंगांची हेळसांड होते आणि मानसिक त्रास होतो. सरकारी अधिकारी-कर्मचाºयांनी अपंगांना सौजन्याने वागणूक देऊन त्यांची शासकीय कामे त्वरित करण्याची गरज आहे.- दत्तू बोडके, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष