शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका काढणार थेट कामांच्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:46 IST

लोकसभा निवडणुकीची नुकत्याच संपलेल्या आचारसंहितेमुळे रखडलेली कामे व पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची टांगती तलवार लक्षात घेता शहरातील विकासकामे खोळंबून राहू नये यासाठी अंदाजपत्रकात तरतूद असलेल्या कामांच्या थेट निविदा काढण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्या संदर्भात गुरुवारी महापौरांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन चर्चाही केली आहे.

ठळक मुद्देआचारसंहितेपूर्वी विकासकामे : पदाधिकारी, प्रशासनाचे एकमत

नाशिक : लोकसभा निवडणुकीची नुकत्याच संपलेल्या आचारसंहितेमुळे रखडलेली कामे व पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची टांगती तलवार लक्षात घेता शहरातील विकासकामे खोळंबून राहू नये यासाठी अंदाजपत्रकात तरतूद असलेल्या कामांच्या थेट निविदा काढण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्या संदर्भात गुरुवारी महापौरांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन चर्चाही केली आहे.महापालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या बजेटचा ठराव महापौरांनी प्रशासनाला पाठविला असून, आता प्रशासनाकडून नगरसेवक निधी आणि विभागनिहाय विकासकामांना झालेली तरतूद यानुसार विकासकामांना प्रारंभ करण्यात आला आहे. अंदाजपत्रकात परिपूर्ण तरतूद असलेल्या विकासकामांची थेट निविदा काढण्याच्या प्रशासनाच्या निर्णयामुळे शहरातील रखडलेल्या विकासकामांना वेग येणार असून, नगरसेवकांची कामे पुढे सरकण्यास मदत होणार आहे.या एकूण प्रकारामुळे महापालिकेच्या विकासकामांना फटका बसू नये म्हणून आता महासभेने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकात विकासकामांना परिपूर्ण निधीची तरतूद करण्यात आली, त्या विकासकामांची थेट निविदा काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ज्या विकासकामांसाठी तरतुदीपेक्षा जास्त प्राकलन खर्च आहे, असे प्रस्ताव महासभेत आणण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक