शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

स्थायीने निर्णय न घेतल्यास थेट अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:06 IST

महापालिकेच्या स्थायी समितीत सादर प्रस्तावावर पंधरा दिवसांच्या आत कोणताही निर्णय न झाल्यास तो संमत समजून कार्यवाही करण्यात येणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका प्रस्तावात तसा उल्लेख करून प्रस्ताव सादर केल्याने समितीला मोठा दणका दिला आहे.

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीत सादर प्रस्तावावर पंधरा दिवसांच्या आत कोणताही निर्णय न झाल्यास तो संमत समजून कार्यवाही करण्यात येणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका प्रस्तावात तसा उल्लेख करून प्रस्ताव सादर केल्याने समितीला मोठा दणका दिला आहे.  महापालिकेच्या स्थायी समितीचे कामकाज नेहमीच चर्चेत असते. एखादा विषय जाणीवपूर्वक निर्णयाविना प्रलंबित ठेवण्यामागे काय गौडबंगाल असते याच्या नेहमीच सुरस कथा चर्चिल्या जातात. स्थायी समितीवर भांडवली कामांसाठी मागवलेल्या निविदांचे करारमदार करण्यासाठी मान्यता घेतली जाते. परंतु त्यात अनेकदा विषय सहेतूकही तहकूब ठेवला जातो. केवळ भांडवली कामांच्या बाबतीतच नव्हे तर एखाद्या आरक्षित भूखंडाचे भूसंपादन करण्यासाठी जागा मालकाने नगररचना अधिनियम १२७ अन्वये नोटीस दिल्यानंतर अशा भूखंडांबाबत विहित कालावधीत निर्णय घेणे अपेक्षित असताना जाणीवपूर्वक हा प्रस्ताव बाजूला ठेवण्याचे प्रकार घडतात. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य शासनाने काही वर्षांपूर्वीच महाराष्टÑ महानगरपालिका अधिनियम ७३(क) मध्ये सुधारणा केली असून, आयुक्तांनी सादर केलेल्या प्रस्तावावर पंधरा दिवसांच्या आत निकाली न काढल्यास हा प्रस्ताव सभेच्या पटलावर घेतलेले असो किंवा नसो, तो स्थायी समितीने मान्यता दिल्याचे मानण्यात येईल, अशीही तरतूद आहे. आजवर कोणत्याही आयुक्तांनी या तरतुदीचा वापर केला नसले तरी विद्यमान आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यावर अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. नाशिकरोड येथे महापालिकेच्या वतीने नूतन बिटको रुग्णालय बांधले जात असून, या इमारतीत अग्निप्रतिबंधात्मक व अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी १७ लाख ७६ हजार ८६६ रुपयांचे काम एका ठेकेदार कंपनीकडून करून घेण्याचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीवर मांडण्यात आला आहे.नाण्याची दुसरी बाजूस्थायी समितीत सादर प्रस्ताव वारंवार तहकूब करण्यामागे वेगळीच कारणे असल्याची किंबहुना अर्थपूर्ण निर्णयांची चर्चा होत असते त्यांना आयुक्तांच्या या पत्राने चाप बसणार आहे. तथापि, स्थायी समितीत सर्वच निर्णय अशाप्रकारे होत नाही. अनेकदा अपुरी माहिती किंवा प्रशासनाच्या निविदा प्रक्रियेतच घोळ असल्याने त्याचा जाब विचारण्यात येतो आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा घेण्यासाठी समिती हा विषय प्रलंबित ठेवते, अशा सद्हेतूने हा विषय प्रलंबित ठेवला तरी त्यालाही यामुळे अडचण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका