दिंडोरी : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांच्या निवडीनंतर राज्य निवडणूक आयोगाने दिंडोरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून, पुढच्या वर्षी १० जानेवारी रोजी नगरसेवक निवडीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी गुरुवारपासून (दि. १०) नामांकन दाखल करण्यास सुरुवात होईल. दिंडोरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच घेऊन ग्रामपंचायतीचा कारभार तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. परंतु नगरपंचायतीत विलीनीकरणास झालेला विरोध पाहता, दिंडोरीची प्रभाग रचना, आरक्षण या साऱ्या बाबींना उशिरा सुरुवात करण्यात आली. परिणामी जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांच्या निवडीही पूर्ण झाल्यात. तत्पूर्वी गेल्या महिन्यातच दिंडोरीची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.
दिंडोरी नगरपंचायतीची निवडणूक घोषित
By admin | Updated: December 4, 2015 22:31 IST