शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

दिंडोरीत जिल्हा बँकेच्या व्यवस्थापकास घेराव

By admin | Updated: April 8, 2017 23:43 IST

दिंडोरी : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन दोन महिन्यांपासून रखडल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

 दिंडोरी : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन दोन महिन्यांपासून रखडल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी असून, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने शिक्षकांचे वेतन एक महिन्यांपासून अदा न केल्याने शिक्षक संघाने जिल्हा बँकेच्या शाखा व्यवस्थापकास घेराव घातला व दीड तास चर्चा केली. पगाराची रक्कम जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत बँकेत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. शाखा व्यवस्थापकांनी जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकांना शिक्षक आंदोलनाबाबत कल्पना दिली.संचालक गणपतराव पाटील यांनी दूरध्वनीद्वारे शिक्षकांशी संपर्क साधून मंगळवारी (दि. ११) पगाराची रक्कम अदा करण्यात येईल, असा शब्द दिल्याने शिक्षकांनी आंदोलन स्थगित केले. वेतन नसल्याने गृहकर्ज, शिक्षण कर्ज, इतर प्रापंचिक देणी थकल्याने शिक्षकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे दिंडोरी येथील रंगानाना संकुलमधील जिल्हा बँकेत खाते असून, नाशिक जि.प. मार्फत दरमहा शिक्षकांच्या पगाराची रक्कम या बँकेत वर्ग करण्यात येते. फेब्रुवारी २०१७ या महिन्याचे वेतन सुमारे साडेतीन कोटी रु पये दि. ६ मार्च २०१७ रोजी जिल्हा परिषदेने या बँकेतील गटविकास अधिकारी यांच्या खात्यावर वर्ग केली होती. त्यानंतर गटविकास अधिकारी यांच्याकडून शिक्षकांचे वेतन त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी धनादेश देण्यात आला. मात्र बँकेत पैसे नसल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर संपूर्ण मार्च महिना उलटून गेला तरीही वेतन अदा करण्यात आलेले नाही. यानंतर शिक्षक संघ, शिक्षक समिती, शिक्षक सेना या संघटना पदाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्य.अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच एनडीसीसी बँकेचे चेअरमन नरेंद्र दराडे, संचालक गणपतराव पाटील यांची भेट घेऊन तक्रार केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून खडसावले. संबंधित अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या पगाराचे इतर चेक क्लिअरिंगसाठी वापरल्याचे उघडकीस आले.यावेळी झालेल्या चर्चेत दिंडोरी तालुका शिक्षक संघाचे तालुका नेते धनंजय आहेर, अध्यक्ष आप्पासाहेब बच्छाव, सरचिटणीस सचिन वडजे, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय वानले, मधुकर आहेर, एन.जे. आहेर, नंदकुमार गांगुर्डे, दत्तात्रय चौगुले, भाऊसाहेब बिरारी, श्रावण भोये, नियाज शेख, बाळासाहेब बर्डे, विलास पेलमहाले, विलास जमदाडे, मुकेश नांद्रे, भाऊसाहेब आहेर, चिंतामण भदाणे, प्रकाश सोनवणे, शरद डगळे, महेश शिरोडे, दिनेश देवरे, कल्याण कुडके, एकनाथ पाटील, दिगंबर बादाड, किरण शिंदे, धिरज शिंपी, गुलाब दातीर आदि शिक्षक संघाचे पदाधिकाऱ्यांनी चर्चेत भाग घेतला. (वार्ताहर)