शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठा खंडित करण्याबाबत डिजिटल स्वरूपात दिलेली नोटीस ग्राह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:11 IST

वीजपुरवठा खंडित करण्याबाबत थकबाकीदार ग्राहकांना डिजिटल स्वरूपात दिलेली नोटीस ग्राह्य धरण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा मार्ग अधिक सोपा व गतिशील झाला आहे.

नाशिकरोड : वीजपुरवठा खंडित करण्याबाबत थकबाकीदार ग्राहकांना डिजिटल स्वरूपात दिलेली नोटीस ग्राह्य धरण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा मार्ग अधिक सोपा व गतिशील झाला आहे.  महावितरणने वीज नियामक आयोगाकडे सादर केलेल्या वीजदर वाढ प्रस्ताव क्रमांक १९५/२०१७ च्या निकालात वीजपुरवठा खंडित करण्याबाबत ग्राहकाला दिलेली डिजिटल नोटीस कायदेशीर ठरविण्याचा निर्णय आयोगाने दिला आहे. परिणामी एसएमएस, व्हॉट्स अ‍ॅप, ई-मेलद्वारे पाठविण्यात येणारी नोटीस ग्राह्य ठरणार आहे. विद्युत अधिनियम २००३ मधील कलम ५६ अन्वये वीजपुरवठा तोडण्यापूर्वी महावितरणने ग्राहकाला लेखी नोटीस देणे अनिवार्य आहे. लेखी नोटीस ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी लागणारा कालावधी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात अडसर ठरत होता. त्यामुळे महावितरणने डिजिटल स्वरूपात पाठविण्यात येणारी नोटीस ग्राह्य धरण्याची मागणी आयोगाकडे केली होती.  गेल्या काही वर्षांपासून महावितरणने वीज ग्राहकांचे मोबाइल क्रमांक तसेच ई-मेल नोंदवून घेतले आहेत. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर वीजपुरवठा, मीटर रिडिंग, वीज बिलाचा तपशील आदींची माहिती एसएमएसद्वारे देण्यात येते.२ कोटी ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकाची नोंदमहावितरणकडे राज्यातील २ कोटी ५ लाख ग्राहकांचे मोबाइल क्रमांक नोंदविण्यात आले आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील ११ लाख ७०७ वीज ग्राहकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण ग्राहकांच्या तुलनेत जवळपास ७७ टक्के ग्राहकांनी त्यांचे मोबाइल क्रमांक महावितरणकडे नोंदविले आहेत. वीज नियामक आयोगाने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी डिजिटल स्वरूपात दिलेली नोटीस कायदेशीर असल्याबाबत मान्यता दिल्याने महावितरणचा मार्ग सुकर झाला आहे.

टॅग्स :electricityवीजbillबिल