शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

बागलाणमध्ये सातशे विहिरींचे खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 16:28 IST

शेतकऱ्यांचा जुगार : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाय

ठळक मुद्देतालुक्यातील एकूण पीक लागवडीचे क्षेत्र ६५ हजार ६४६ हेक्टर असून, त्यापैकी रब्बी हंगामाचे लागवड क्षेत्र केवळ १२ हजार १७० हेक्टर आहे.

खमताणे : दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणा-या बागलाण तालुक्यातील शेतीव्यवसाय पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे या क्षेत्रात नेहमीच पाण्याची आस लागलेली असते. दर वर्षीप्रमाणे यंदाही पाण्यासाठी शेतक-यांचा जुगार सुरू असून तालुक्यात सद्यस्थितीत सुमारे सातशे विहिरींचे खोदकाम सुरू आहे. त्यावर सुमारे सुमारे पंचवीस कोटी रुपये खर्ची पडत आहेत.तालुक्यातील एकूण पीक लागवडीचे क्षेत्र ६५ हजार ६४६ हेक्टर असून, त्यापैकी रब्बी हंगामाचे लागवड क्षेत्र केवळ १२ हजार १७० हेक्टर आहे. तालुक्यातील उत्तर-पूर्व भाग दुष्काळी तर पश्चिम-दक्षिण भाग हे कॅनाल क्षेत्राकाठी येतात. तालुक्यातील जमीन पाण्याचा निचरा होणारी असल्यामुळे भूजल पातळीही खोलवर गेली आहे. शेतातील पिकांना पाणी मिळावे, शेत बागायती झाले पाहिजे. यासाठी दरवर्षी पाण्याची टंचाई निर्माण झाली की, शेतक-यांचा विहिरीसाठी शोध सुरू होतो. गेल्या दहा -बारा वर्षात विहिरी आणि असंख्य कूपनलिका खोदल्या जातात. विहिरी व कूपनलिका खोदण्यासाठी कधी कष्टाने हंगामात मिळविलेली मिळकत टाकण्यात येते, तर कधी बँक, सोसायट्यांकडून कर्ज घेऊन पाण्याचा शोध घेतला जातो. पाणी लागले तर शेती बागायती होते. परंतु बाजारभाव धोका देऊन जातो . घेतलेल्या कर्जाचा आकडा वाढत असल्यामुळे आर्थिक स्थिती बिघडते आणि शेतकरी या दुष्टचक्र ात अडकत जातो.५ टक्केच विहिरींना पाणीतालुक्यात १७९ खेड्यांमधुन सुमारे ७०० नव्याने विहीरी खोदल्या जात आहेत. साठ फूट खोलीची विहिर खोदून बांधण्यासाठी सुमारे तीन लाख पन्नास हजार रूपयांचा खर्च लागतो. त्यामुळे दर वर्षी पाण्याच्या शोधासाठी बागलाण तालुक्यात सुमारे पंचवीस रूपयांचा जुगार खेळला जातो. यात राज्य शासनाच्या रोजगार हमी योजनेंतर्गत अनुदानित विहिरीची संख्या वेगळी आहे . यातील सरासरी ५ टक्के विहिरींना पाणी लागते, तर बाकी शेतक-यांचा खर्च व्यर्थच जात असल्याने कर्जाचा बोजा वाढतच जातो.

टॅग्स :Nashikनाशिक