शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

विधानसभा निवडणूक महायुतीसाठी अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 00:45 IST

नाशिक : भाजप, शिवसेनेसह विविध दहा घटक पक्षांच्या महायुतीत आरपीआयला किमान दहा जागा मिळणे अपेक्षित होते. परंतु, जागावाटपाचा तिढा सोडविताना आमच्या वाट्याला केवळ सहा जागा आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे सांगतानाच यावेळची विधानसभा निवडणूक युतीसाठी अवघड असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी (दि.५) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देरामदास आठवले : अपेक्षित जागा न मिळाल्याने व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भाजप, शिवसेनेसह विविध दहा घटक पक्षांच्या महायुतीत आरपीआयला किमान दहा जागा मिळणे अपेक्षित होते. परंतु, जागावाटपाचा तिढा सोडविताना आमच्या वाट्याला केवळ सहा जागा आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे सांगतानाच यावेळची विधानसभा निवडणूक युतीसाठी अवघड असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी (दि.५) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.महायुतीच्या जागावाटपात आपण देवळाली, भुसावळसह आणखी काही जागांची मागणी केली होती, परंतु उत्तर महाराष्ट्रात आम्हाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आरपीआयवर अन्याय झाल्याची भावना पसरल्याने प्रचंड नाराजी असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. महायुतीत आरपीआयला किमान १० जागा मिळण्याची अपेक्षा होती, मात्र आमच्या वाट्याला केवळ सहा जागा आल्या आहेत. त्यातही मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवार दिला आहे. त्यामुळे आमच्या वाट्याला केवळ पाच जागा येणार असल्याने या जागेचा तिढा सोडविण्यासाठी आपण उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, आपल्यावर अन्याय होत असला तरी सत्तेत सहभागी होऊन अन्याय दूर करता येणार असल्याचे सांगतानाच आपल्या वाट्याला आलेल्या सर्व जागा जिंकण्यासाठीच आपण भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘वंचित’ला लोकसभेप्रमाणे प्रतिसाद नाहीअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभेत चांगले मतदान झाले असले तरी विधानसभा निवडणुकीत त्यांना लोकसभेप्रमाणे प्रतिसाद मिळणार नसल्याचे भाकीत रामदास आठवले यांनी केले. पक्षांतरामुळे सध्याच्या स्थितीत कोण कोणत्या पक्षात आहे हेच सांगणे कठीण असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कोणी नेते उरले नसल्याने या निवडणुकीत महायुतीला २४० ते २५० जागा मिळून पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, तर आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यताही त्यांनी यावेळी वर्तविली. युतीत नेहमीच गडबडभाजप आणि शिवसेनेदरम्यान विविध मुद्द्यांवरील मतभेद सर्वश्रुत असून, गतपंचवार्षिकमध्ये दोन्ही पक्ष सत्तेत असतानाही ते प्रकर्षाने दिसून आले असताना युतीत नेहमीच गडबड असल्याचे सांगतानाच आपणच मध्यस्थी करून ही गडबड दूर करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकत्रीकरणाची कल्पनाही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आपणच आणल्याने आज समाजात परिवर्तन दिसून येत असल्याचेही आठवले म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019