शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल शवदाहिनी  तीन महिन्यांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:35 IST

पर्यावरण रक्षणाचा विचार करून महापालिकेने नाशिक अमरधाममध्ये सुरू केलेली डिझेल शवदाहिनी गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्तीअभावी बंद पडली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या वतीने आणखी दोन ठिकाणी डिझेल शवदाहिनी सुरू करण्यात येणार आहे.

नाशिक : पर्यावरण रक्षणाचा विचार करून महापालिकेने नाशिक अमरधाममध्ये सुरू केलेली डिझेल शवदाहिनी गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्तीअभावी बंद पडली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या वतीने आणखी दोन ठिकाणी डिझेल शवदाहिनी सुरू करण्यात येणार आहे. तथापि, एकमेव शवदाहिनीची दुरुस्ती होत नसताना नव्यांची तरी देखभाल दुरुस्ती होईल काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. नाशिक शहरातील सर्वच अमरधाममध्ये मोफत अंत्यसंस्कार योजना राबविली जाते. अंत्यसंस्कारासाठी लाकूडही दिले जाते. त्यामुळे वृक्षतोड टळावी तसेच जलदगतीने अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी मनपाच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर नाशिक अमरधाममध्ये डिझेल शवदाहिनी उभारण्यात आली होती. त्याला सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, नंतर प्रतिसाद वाढत गेला. परंतु महापालिकाच या शवदाहिनीकडे लक्ष पुरवत नाही. ती अनेकदा बंद असते. आताही गेल्या तीन महिन्यांपासून शवदाहिनी बंद असून, तिची दुरुस्तीच सुरू आहे.  नाशिकमध्ये या स्वरूपाचे काम करणारी कंपनी नसल्याने ठाणे येथील एका कंपनीला हे काम दिले जाते. त्यानुसार कंपनीने काम पूर्ण केले आहे. मात्र, चिमणीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार ठाण्याच्या ठेकेदाराने चिमणीच्या दुरुस्तीचे काम स्थानिक ठेकेदाराला दिले असून, त्याच्याकडून विलंब होत असल्याने अद्यापही शवदाहिनी कार्यान्वित होऊ शकलेली नाही. नाशिकमध्ये आता नागरिकांचा डिझेल शवदाहिनीकडे कल वाढला असून, महिन्याकाठी दोन ते तीन अंत्यसंस्कार डिझेल शवदाहिनीत होतात.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका