शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भर दिवसा बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 13:18 IST

पिळकोस - येथील पळासे शिवारात तब्बल पंधरा दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला असून आता या गेल्या महिन्याभरापासून परिसरात भर दिवसाही बिबट्या दृष्टीस पडू लागल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्यावतीने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पिळकोस - येथील पळासे शिवारात तब्बल पंधरा दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला असून आता या गेल्या महिन्याभरापासून परिसरात भर दिवसाही बिबट्या दृष्टीस पडू लागल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्यावतीने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पिळकोस येथील शेतकरी कौतिक दौलत मोरे यांच्या पळासे शिवारात त्यांनी त्याच्या घरच्या दुभत्या जनावरांसाठी चार एकर हिरवा चारा केलेला असून त्यांचा मुलगा आदित्य मोरे ,व सालगडी हे काल चार वाजता चारा घेण्यास गेले असता बिबट्या हा शेताच्या बांधावर बसलेला होता. त्यावेळेस आदित्य त्याचा मित्र दुर्गेश सूर्यवंशी व सालगडी यांनी त्याच पाउली मागे फिरत रस्त्याकडे धाव घेतली . गेल्या सहा महिन्यापासून या परिसरात बिबट्याने दहशत माजवलेली असून भादवण पिळकोस शिवार तर कधी गिरणा नदी शिवार तर काही वेळेस गिरणा नदीवरील पिळकोस ङ्क्तबगडू पुलावर आता बिबट्या दिवसा दिसू लागल्याने शेतकरी ,पशुपालक ,व शेतमजूर हे धास्तावले असून परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे . पाच ते सहा वर्षापासून ह्या शिवारात बिबट्याचा संचार असल्याने बिबट्याच्या हल्ल्यात आजवर कित्येक शेतकर्यांचे व पशुपाल्कानाचे जनावरांचा फडशा बिबट्याने पडलेला आहे . भादवण शिवारात बिबट्याचा वावर हा सततचा असल्याने शेतकर्यांना व पशुपालकांना बिबट्याचे सतत भय लागून राहत असल्याने शिवारात दिवसाही भीती वाटू लागल्याने वनविभागाने बिबट्याला जेरबंद करावे व हा परिसर कायमचा बिबट्याच्या दहशतीतून मुक्त करावा अशी मागणी शांताराम जाधव ,दुर्गेश सूर्यवंशी ,सचिन वाघ ,केवळ वाघ ,प्रवीण जाधव ,संदीप जाधव ,निवृत्ती जाधव ,दादाजी जाधव ,बुधा जाधव ,रवींद्र वाघ ,राहुल सूर्यवंशी ,साहेबराव आहेर ,प्रभाकर जाधव ,हेमंत जाधव ,सुरेश जाधव ,राहुल जाधव ,मंगेश जाधव ,अभिजित वाघ ,यांसह पशुपालक ,शेतमजूर ,व शेतकºयांनी केली आहे .-----------------पळासे शिवारात बिबट्या हा नेहमी वावरत असून आजवर आम्हाला त्याच्या पावलांचे ठसे मिळून आले होते व आता तर बिबट्या दिवसाही दिसून येत असल्याने साहजिक भीती वाटू लागली आहे. सालगडी ,शेतमजूर ,कामाला येण्यास धजावत नसून शेतीच्या कामावर विपरीत परिणाम होत आहे. वनविभागाने पिंजरा लाऊन बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे .- कौतिक दौलत मोरे ,शेतकरी ,पिळकोस 

टॅग्स :Nashikनाशिक