नाशिक : चिकुणगुण्यासदृश्य आजार, विषमज्वर, विषाणुजन्य ताप, विषाणुजन्य सांधेदुखी अशा एकत्रित रोगांचा वडाळागाव परिसरात प्रादुर्भाव झाल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या आरोग्य विभागाने काढला आहे. विषमज्वरचे काही रुग्ण तर सांधेदुखी आणि विषाणुजन्य तापाचा त्रास असलेल्या रुग्णांची संख्या यामध्ये अधिक असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. एकूणच गूढ आजाराची उकल होण्यास सुरुवात होऊ लागली असून, रुग्णांनी मर्यादित कालावधीपर्यंत गोळ्या-औषधे पूर्णत: घ्यावी. तसेच घरगुती पाणीसाठे दिवसाआड स्वच्छ करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
चिकुणगुण्यासदृश आजाराचे निदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:16 IST