शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

दहावी, बारावी निकालात धुळे जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:14 IST

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नोव्हेंबर/डिसेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि ...

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नोव्हेंबर/डिसेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल विभागीय मंडळाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी जाहीर केला. विभागात दोन्ही परीक्षेत धुळे जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावीचा विभागाचा निकाल ३७.४२, तर बारावीचा निकाल २३.६३ टक्के इतका लागला. नाशिक विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेत ३८८० पैकी १४५२ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.४२ टक्के इतकी आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातून १७६६ पैकी ५५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ३१.४८ टक्के इतकी आहे. धुळे जिल्ह्यातील ३७० पैकी २१३ विद्यार्थी (५७.५७ टक्के), उत्तीर्ण झाले. जळगावमधील १०३४ पैकी ४९४ (४७.७८ टक्के), तर नंदुरबारमधील ७१० पैकी १८९ (२६.६२टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

इयत्ता बारावीची परीक्षा विभागात एकूण २९ केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठी ७५०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७४९२ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले असून, १७७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी २३.६३ इतकी आहे. नाशिक जिल्ह्यातील ३९५२ पैकी ७४२ (१८.७८ टक्के) धुळे जिल्ह्यातील ७७७ पैकी २६१(३३.५९ टक्के), जळगाव जिल्ह्यातील १२६६ पैकी ३६८ २९.०७ टक्के), तर नंदुरबार जिल्ह्यातून १४९७ पैकी ३९९ (२६.६५) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागातील उत्तीर्णतेची टक्केवारी २३.६३ इतकी आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी दिली. यावेळी विभागीय सचिव राजेंद्र अहिरे उपस्थित होते.

--इन्फो--

दहावीत तीन कॉपी प्रकरणे आढळून आली, तर बारावीत मात्र एकही कॉपी प्रकरण समोर आले नाही. दहावीतील ३ प्रकरणांपैकी दोन विद्यार्थ्यांचा गैरमार्गाशी थेट संबंध नसल्याने त्यांचे निकाल जाहीर करण्याचे प्रस्तावित आहे. एका विद्यार्थ्याने गुन्हा कबूल केल्याने मंडळ शिक्षासूचीनुसार त्यांचे संबंधित विषयाचे गुण रद्द करण्यात आले आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण पडताळणी तसेच छायांकित प्रतींसाठी नियमानुसार संधी देण्यात आली आहे. गुण पडताळणीसाठी २४ तारखेपासून २ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यंना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनदेखील करता येणार आहे.