शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक संघटनेचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:23 IST

नाशिक जिल्हा परिषद स्तरावरील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या प्रलंबित समस्या सुटत नसल्याने तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या नकारात्मक भूमिकेच्या विरोधात ग्रामसेवक संघटनेने असहकार आंदोलन पुकारले आहे. त्याचाच भाग म्हणून तालुक्यातील ग्रामसेवकांनी सोमवारी सामुदायिक रजा टाकून सिन्नर पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

सिन्नर : नाशिक जिल्हा परिषद स्तरावरील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या प्रलंबित समस्या सुटत नसल्याने तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या नकारात्मक भूमिकेच्या विरोधात ग्रामसेवक संघटनेने असहकार आंदोलन पुकारले आहे. त्याचाच भाग म्हणून तालुक्यातील ग्रामसेवकांनी सोमवारी सामुदायिक रजा टाकून सिन्नर पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.  ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय गिरी, सरचिटणीस जालिंदर वाडगे यांच्या नेतृत्त्वाखाली धरणे आंदोलन केल्यानंतर तहसीलदार नितीन गवळी व गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांना संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्या सुटत नसतानाही ग्रामसेवक ग्रामीण भागात ताणतणावाच्या वातावरणात काम करीत आहेत. गेल्या वर्षी स्वच्छ भारत अभियानात उद्दिष्टांपेक्षा जास्त शौचालयांचे बांधकाम केल्याने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांच्या सत्कार करण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वर येथे दिव्यांग महामेळावा यशस्वी करण्यात ग्रामसेवकांचा मोठा वाटा होता. सर्व कामे सांभाळून गाव स्तरावर मूलभूत सुविधा पुरविण्याचे काम ग्रामसेवक करीत आहेत. असे असताही ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्या सुटल्या नाहीत. उलट मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांची नकारात्मक भूमिकाच स्पष्टपणे दिसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. समस्या सोडविण्यात मीणा यांना स्वारस्य दिसत नाही. गेल्या २० वर्षांत ग्रामसेवक संघटनेने जिल्हा स्तरावरील समस्यांकरिता आंदोलन केले नाही. मात्र मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या नकारात्मक भूमिकेमुळे संघटनेने असहकार आंदोलन सुरू केल्याचे निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनाची दखल घेऊन दीपककुमार मीणा यांची त्वरित बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे. बदली न झाल्यास २९ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर व त्यानंतर ५ फेबु्रवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.  धरणे आंदोलनप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे, सदस्य जगन्नाथ भाबड, प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, आर. टी. शिंदे, के. एल. भदाणे, राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे, नामदेव कोतवाल, जयराम शिंदे, दीपक लहमागे यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दर्शविला.  आंदोलनात दीपक निकम, परेश जाधव, जगन्नाथ पाटील, संदीप  देवरे, वनिता वर्पे, संतोष बुचडे, राजेंद्र शिरोरे, फुलचंद वाघचौरे यांच्यासह तालुक्यातील ग्रामसेवक सहभागी  झाले होते. वाघ यांच्या आत्महत्येची सीआयडी चौकशीची मागणी धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथील ग्रामसेवक एस. बी. वाघ यांनी ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १५ जानेवारी रोजी घडली होती. या आत्महत्येस प्रवृत्त करणाºयांना कठोर शासन व्हावे व याकरिता या संपूर्ण प्रकरणाची सीआयडीतर्फे चौकशी करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेने केली आहे. या मागणीचे निवेदनही तहसीलदार व संबंधित अधिकाºयांना देण्यात आले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNashikनाशिक