शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या उन्हामुळे गोदाकाठ पडला ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 13:59 IST

धार्मिक पुुण्यनगरी म्हणून ओळख असलेला नाशिकचा रामकुंड, पंचवटीचा परिसर वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे ओस पडत आहे. परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे.

ठळक मुद्दे गोदाकाठाचा रामकुंड परिसरही ओस उन्हाचा चटका शहरात जाणवू लागला संध्याकाळच्या सुमारास काही प्रमाणात रामकुंडाच्या परिसरात गजबज पहावयास मिळते.

नाशिक : येथील गोदावरीचा रामकुंड परिसर नेहमीच भाविक पर्यटकांनी गजबजलेला पहावयास मिळतो; मात्र मागील तीन दिवसांपासून शहराच्या कमाल तपमानात वाढ होऊ लागल्याने उन्हाचा चटका शहरात जाणवू लागला आहे. यामुळे गोदाकाठाचा रामकुंड परिसरही ओस पडू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.भारताची दक्षिणवाहिनी गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरीनदीला धार्मिकदृष्टया विशेष महत्त्व आहे. विविध धार्मिक कार्य, विधीसाठी भाविक देशभरातून या ठिकाणी हजेरी लावतात. रामकुं ड परिसराला धार्मिक-पौराणिकदृष्टया महत्त्व प्राप्त आहे. यामुळे भाविकांची सतत या भागात वर्दळ पहावयास मिळते.

गोदाकाठावर विविध प्राचीन व पौराणिक मंदिरे आहेत. नंदी नसलेले महादेव शंकराचे एकमेव शिवलींग असलेले प्राचीन कपालेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, बाणेश्वर मंदिर, देवमामलेदार मंदीर, काळाराम मंदिरासह पंचवटी, सीतागुंफाचा परिसर रामकुंडापासून जवळच असल्यामुळे भाविका येथे आवर्जून हजेरी लावतात. मंदिरांंचे स्थापत्य बघण्यासारखे आहे. धार्मिक पुुण्यनगरी म्हणून ओळख असलेला नाशिकचा रामकुंड, पंचवटीचा परिसर वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे ओस पडत आहे. परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे. तसेच बारावीच्या परीक्षांसह प्राथमिक वर्गांच्याही परीक्षांचा हंगाम सुरू झाला आहे. यामुळे भाविकांची संख्या कमी झाली आहे. संध्याकाळच्या सुमारास काही प्रमाणात नाशिककर रामकुंडाच्या परिसरात फेरफटका मारण्यासाठी येतात. त्यावेळी गजबज पहावयास मिळते.

टॅग्स :NashikनाशिकgodavariगोदावरीTempleमंदिर