शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडच्या गुरुद्वारातील पंजाबचे भाविक रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 23:51 IST

मनमाड : येथील गुरु द्वारामध्ये लॉकडाउनमुळे अडकलेल्या पंजाबमधील १३० भाविकांना त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले. गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंग यांच्या हस्ते झेंडा दाखवून चार बस पंजाबकडे मार्गस्थ झाल्या.

मनमाड : येथील गुरु द्वारामध्ये लॉकडाउनमुळे अडकलेल्या पंजाबमधील १३० भाविकांना त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले. गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंग यांच्या हस्ते झेंडा दाखवून चार बस पंजाबकडे मार्गस्थ झाल्या.पंजाब प्रशासनाकडून पत्रान्वये महाराष्ट्र राज्य शासनाकडे मनमाडमध्ये अडकलेल्या भाविकांना पंजाबमध्ये पाठविण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती करण्यात  आली होती. या मागणीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी समन्वयातून मनमाड येथील भाविकांना पंजाब राज्यात परतण्यासाठी विशेष प्रयत्न केले.पंजाबमधून ज्या बसेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणण्यात आले होते. त्या बसेसच्या माध्यमातून सर्व भाविकांना आपल्या मूळगावी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. या सर्व भाविकांची पंजाबमध्ये जाण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या भाविकांना मध्य प्रदेश, राजस्थान यामार्गे पंजाबमध्ये पाठविण्यात आले आहे.तसेच पंजाबमध्ये पोहोचल्यानंतर या सर्व नागरिकांना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. यावेळी मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर, पोलीस उपविभागीय अधिकारी समर सिंग साळवे आदी उपस्थित होते. यासाठी मनमाड गुरुद्वाराचे मुख्य प्रबंधक बाबा रणजित सिंह जी, धनंजय कमोदकर, रणजीत सिंग आनंद, मोहिता नारंग, बलजित सिबल व पंजाबी असोसिएशन यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :Nashikनाशिक