शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग सौंदर्यात भर घालणाऱ्या देवदरीत भाविकांना प्रवेश बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 17:10 IST

एरंडगाव : नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या देवदरी येथे पुरातन श्री महादेव मंदिर असल्याने श्रावणात भाविकांची व पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसह पर्यटकांनाही प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदेवदरी हे देवनदीचे उगमस्थान आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कएरंडगाव : नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या देवदरी येथे पुरातन श्री महादेव मंदिर असल्याने श्रावणात भाविकांची व पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसह पर्यटकांनाही प्रवेशबंदी करण्यात आली आहे.निसर्ग सौंदर्यात भर घालणारे देवदरी हे लहानसे गाव येवला तालुक्याच्या पुर्व टोकावर वसलेले आहे. देवदरी हे देवनदीचे उगमस्थान आहे. येथूनच देवनदी उगम पावते आणि तिचे दरीत रूपांतर होते. या दरीत महादेवाचे पुरातन घुमटाकार मंदीर आहे. या दरीमध्ये देवाचे स्थान असल्यानेच या गावाला देवाची दरी यावरु न देवदरी हे नाव पडले असावे असे जुन्या जाणत्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथे श्रावण महिन्यात मोठा यात्रोत्सव भरतो. देवदरी भाविकांच्या, पर्यटकांच्या आगमनाने गजबजुण जाते, परंतु या वर्षी कोरोनामुळे सर्वांनाच प्रवेश बंदी करण्यात आली आहे.नासिक व औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर वसलले हे गाव तसे विकासापासुन वंचित असले तरी निसर्गाने या ठिकाणाला भरभरून सौंदर्य दिले आहे. येथे असलेला पुरातन वटवृक्ष, खोल असलेली दरी. दरीच्या दुतर्फा झापुळलेले वृक्ष वेलींचे मांडव व मनाला आकर्षित करणारा पांढराशुभ्र धबधबा, पाण्याने भरलेले लहान लहान बंधारे या निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटकांना भावतात. देवनदीवर देवनाक्या प्रकल्पाची मागणी करण्यात आलेली असल्याचे प्राचार्य दिनकर दाणे यांनी सांगितले. हा प्रकल्प झाला तर या ठिकाणाला अभयारण्याचा दर्जा प्राप्त होईल. या परिसरात वास्तव्य करणाºया हरण, काळवीट यांना हक्काचे निवासस्थान मिळेल. देवनदी ही तालुक्यातील अशी एकमेव नदी आहे की जी पुढे माणिकपुंजहुन गिरणा व पुढे तापीनदीला मिळून अरबीसमुद्रात विलीन होते. अशा या निसर्गरम्य व धार्मिक स्थळाचा शासनाने विकास करावा अशी मागणी प्राचार्य दाणे व ग्रामस्थांनी केली आहे. 

टॅग्स :Natureनिसर्गTempleमंदिर