शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

देवळा पोलिस निरीक्षकासह दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 18:56 IST

कारवाई : १५ हजारांची लाच स्वीकारताना पकडले

ठळक मुद्देसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शेलार यांना देवळा पोलीस ठाण्यात पंधरा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

नाशिक : शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी २५ हजाराची लाच मागणारे जिल्ह्यातील देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर नाशिकलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, भऊर, ता. देवळा येथील रमेश तानाजी जाधव (वय ३६) यांचे त्यांच्या नातेवाईकांशी शेतीच्या वादातून भांडण झाले होते. यासंदर्भात जाधव यांनी देवळा पोलिसात तक्रार दाखल केलेली होती. त्यांच्यावर पोलीस कारवाई व्हावी यासाठी देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शेलार यांनी रमेश जाधव यांच्याकडून पंचवीस हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी नंतर पंधरा हजार रुपये देण्याचे ठरले होते. याबाबत जाधव यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रर दाखल केली होती. या तक्ररीवरून बुधवारी (दि.२०) दुपारी साडे तीन वाजता नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले व अपर पोलिस अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम, पोलीस निरीक्षक मृदुला नाईक, पोलीस हवालदार वैभव देशमुख, नितीन कराड, शामकांत पाटील, प्रवीण महाजन, संतोष गांगुर्डे, विनोद पवार यांच्या पथकाने कारवाई करून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शेलार यांना देवळा पोलीस ठाण्यात पंधरा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करीत आहेत.सपकाळेंना न्यायालय आवारातून अटकपोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे हे न्यायालयीन कामासाठी नाशिक सत्र न्यायालयात गेले असताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून त्यांना न्यायालयाच्या आवारातून ताब्यात घेतले. दोघांचीही चौकशी चालू असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .

टॅग्स :NashikनाशिकAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग