नाशिक : गंगापूर येथील सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेचे संचालक व माजी खासदार देवीदास पिंगळे हे सलग तीन सभांना गैरहजर राहिल्याने त्यांचे संचालकपद रद्द ठरविण्याची मागणी संस्थेचे अध्यक्ष दिनकर पाटील यांच्यासह सात सदस्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, संस्थेचे कामकाज हे सहकारी कायदा व उपनिबंधक कार्यालयाने मंजूर केलेल्या पोटनियमानुसार चालते. संस्थेची मासिक सभा नियमाप्रमाणे घेतली जाते. सदर सभांवर संस्था आणि सभासदांच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय चर्चेला घेतले जातात. संस्थेच्या तीन सभा झाल्या असता त्यात संस्थेचे संचालक देवीदास पिंगळे हे गैरहजर राहिले. त्यामुळे पिंगळे यांचे संचालकपद रद्द करावे, अशी मागणी दिनकर पाटील, हिरामण बेंडकोळी, दौलतराव पाटील, मधुकर खांडबहाले, अनिता चव्हाण, शीला पाटील व कार्यकारी संचालक एस. पी. कदम यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
‘देवीदास पिंगळे यांचे संचालकपद रद्द करावे’
By admin | Updated: September 2, 2016 23:15 IST